शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दिलबहार तालीम मंडळ उपांत्य फेरीत

By भीमगोंड देसाई | Updated: February 28, 2023 21:34 IST

सतेज चषक फुटबॉल स्पर्धा : २-१ने विजय, बीजीएमने झुंजवले

लोकमत न्यूज नेटवर्क, भीमगोंडा देसाई, कोल्हापूर : येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाने आणि बीजीएम स्पोटर्सवर २-१ने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र बलाढ्य दिलबहारला बीजीएमने शेवटपर्यंत झुंजवले. त्यांनी आक्रमक चढाया केल्या, पण अनेक चढाया वाया गेल्याने दिलबहारने विजय खेचून आणला.

पाटाकडील तालीम मंडळातर्फे सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोन्ही संघाकडून जोरदार चढाया करून गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र पूर्वाधात दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात यश आले नाही. यामुळे सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. परिणामी उत्तरार्धाकडील खेळाकडे शौकिनांचे लक्ष लागून राहिले. उत्तरार्धात दिलबहारचा संडे ओबेम याने ७५व्या मिनिटास गोल नोंदवला. त्यानंतर बीजीएमच्या वैभव राऊत याने ७६व्या मिनिटाला गोल नोंदवून पुन्हा संघ बरोबरीत नेला. दिलबहारच्या पवन माळी याने ८३व्या मिनिटांस गोल नोंदवून संघास आघाडी मिळवून विजयापर्यंत नेले.

दिलबहारकडून स्वयंम साळुखे, राहुल तळेकर, पवन माळी, सतेज साळुखे, तर बीजीएमकडून ओपेरा, प्रथमेश पाटील, वैभव राऊत, अभिषेक सावंत, संकेत जरग, केवल कांबळे यांनी चांगला खेळ केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर