शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरीचं वैभव असणाऱ्या हत्ती महालच्या उरल्या केवळ भिंती, ऐतिहासिक खुणा होतायत नष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 17:08 IST

राधानगरीला जसे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे, तसा ऐतिहासिक वारसाही

गौरव सांगावकरराधानगरी : राधानगरीच्यापर्यटनात भर टाकणारा हत्तीमहाल आत्ता झाडाझुडपांनी वेढला आहे. मोठमोठ्या झाडांची मुळे, उंच चढलेल्या वेली, मुंग्यांची वारुळे, मधमाश्यांची पोळी यांमुळे हत्तीमहालाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होत आहेत. राधानगरीला जसे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे, तसा ऐतिहासिक वारसाही आहे. धरणाच्या मध्यभागी असणारा 'बेनजर व्हिला,’ असेल किंवा राधानगरीपासून २ कि.मी. अंतरावर असणार हत्तीमहाल, त्यांची आज अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.

पूर्वी हत्तींना बांधण्यासाठी किंवा खेळवण्यासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी १९०८ च्या सुमारास हत्तीमहालाची बांधणी करवून घेतली. या वास्तूत हत्तींच्या निवाऱ्यासाठी स्वतंत्र खोल्या, अशी रचना आहे. प्रत्यक्षात काटकोनात असणारी ही वास्तू तीन मोठ्या कमानींनी जोडली आहे. मध्यभागी मोठी प्रशस्त जागा. दगडी बांधकामात असलेली ही दोनमजली भव्य वास्तू आहे. हत्ती बांधत असलेल्या मोठमोठ्या लोखंडी रिंगा आजही येते पाहावयास मिळतात. महालाच्या बाहेरील बाजूस हत्ती खेळण्यासाठी असणारे बुरूज इतिहासजमा झाले आहेत. पर्यटनाची पंढरी म्हणून तालुका नावारूपाला येत असताना दुसरीकडे मात्र ऐतिहासिक ठेवा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटक येथे येतात; पण हत्तीमहालाची माहिती देणारा साधा फलकही येथे नाही. प्रत्येक वेळी नवीन आराखडा तयार केला जातो. हत्तीमहाल वास्तूच्या जतन व संवर्धनाचा प्रस्ताव प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून मंजूर झाला. त्यासाठी ६१ लाखांच्या निधीची तरतूद झाली. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. पुरातन विभाग तसेच स्थानिक प्रतिनिधींनी आत्ता तरी लक्ष देणे गरजेचे आहे. भग्नावस्थेत असणाऱ्या या वास्तूचा कायापालट होणार कधी, असा प्रश्न पर्यटक व निसर्गप्रेमी विचारत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीtourismपर्यटनhistoryइतिहास