शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

डिजिटल व्यवहारांवर शुल्क लागणार?, दुकानदार, विक्रेत्यांकडील स्कॅनर झाले गायब 

By संदीप आडनाईक | Updated: April 4, 2023 16:54 IST

आर्थिक उलाढालीवरही परिणाम होणार

कोल्हापूर : बाजारात जाणारा प्रत्येक व्यक्ती आपले पाकिट घरात ठेवून केवळ मोबाईलवर जात आहे, इतका डिजिटल व्यवहार अंगवळणी पडला आहे, मात्र यापुढे खिशात पाकिट पुन्हा ठेवावे लागणार आहे. कारण हे व्यवहार आता मोफत मिळणार नाहीत. या व्यवहारांवर निश्चित रक्कम आकारण्यात येण्याची चिन्ह दिसत आहेत.एप्रिलपासून दोन हजार रुपयांच्यावरच्या व्यवहारांवर २२ रुपये आकारण्याची चर्चा आहे. याची धास्ती सामान्य विक्रेत्यांनी घेतली आहे. स्थानिक बाजारात यासंदर्भात चौकशी केली असता बहुतेकांनी ऑनलाईन पेमेंटचे स्कॅनर बाजूला काढून ठेवल्याचे आढळून आले. दुकानदारांकडे हे स्कॅनर दिसून आले असले तरी फेरीवाले, भाजी विक्रेते, फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांची मात्र रोखीच्या व्यवहारावर भिस्त आहे. आम्ही फक्त रोखीने व्यवहार करतो असे फलक यापुढे लागणार आहेत.यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा आणि त्यातून सरकारी तिजोरीत भर घालण्यावर चर्चा सुरु झाली आहे. याचा सामान्य व्यक्तींच्या व्यवहारांवर थेेट परिणाम होणार आहे. ‘यूपीआय’ म्हणजे पैसे हस्तांतरित करण्याच्या सहजसुलभ तांत्रिक पध्दतीमुळे डिजिटल पेमेंटकडे लोक मोठ्या प्रमाणात वळले आहेत. मात्र बॅंकांद्वारे होणाऱ्या प्रत्येक डिजिटल व्यवहारावर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव ‘रिझर्व्ह बॅंके’कडे आहे. ‘गुगल पे’, ‘फोन पे,’ ‘पेटीएम’, भारत पे’ यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील व्यवहारासाठी येणारा खर्च सध्यातरी हे प्लॅटफॉर्म स्वत: सहन करत आहेत. मात्र आता त्याचा बोजा ग्राहकांवरही पडणार आहे.

अद्यापतरी कोणत्याही यूपीआय कंपन्यांनी शुल्क लावण्यासंदर्भात घोषणा केलेली नाही. मात्र येत्या एक ते दोन वर्षात तसे घडू शकते. ‘डिस्कशन पेपर ऑन चार्ज इन पेमेंट सिस्टिम’ या नावचा रिझर्व्ह बॅंकेचा हा प्रस्ताव ‘यूपीआय’ व्यवहारांसाठीचा मुलभूत खर्च व या व्यवहारांची संख्या यातील तफावत पाहता तो खर्च वसूल करण्याचा आग्रह डिजिटल प्लॅटफार्मकर्त्यांचा आहे. सध्या ‘पेटीएम’ने असे शुल्क लागू करण्याचे ठरविले होते, मात्र अनेक तज्ज्ञांनी सध्या ही परिस्थिती अनुकूल नसल्याचा मुद्दा ठामपणे मांडल्याने सध्या तो लागू होणार नाही. - डॉ. विजय ककडे, राष्ट्रीय साधनव्यक्ती, सेबी. 

अशाप्रकारच्या व्यवहारांवर शुल्क लागू झाल्यास सामान्य माणसांना अडचणीचे ठरणार आहे. या व्यवहारांचा ओघ कमी होउ शकतो. याचा आर्थिक उलाढालीवरही मोठा परिणाम होईल. - उदय तलवार, फळविक्रेता, लक्ष्मीपुरी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdigitalडिजिटल