शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर जैन समाजाचा सरकारला ताकद दाखवण्याचा इशारा, कोल्हापुरात भव्य मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 16:59 IST

मोर्चाद्वारे पालकमंत्र्यांना निवेदन : श्वेतांबर समाजाची दादागिरी सुरू असल्याचा आरोप

कोल्हापूर : अकोला जिल्ह्यातील शिरपूर येथे आलेल्या गुजराती जैन श्वेतांबरांची अनेक ठिकाणी दादागिरी सुरू आहे. यातूनच शिरपूर येथील अंतरिक्ष दिगंबर जैन मंदिरात अतिक्रमण केले जात आहे. मारहाणीसारखे प्रकार होत आहेत. याबाबत राज्यातील पोलिस खाते भाजपच्या एका श्वेतांबर मंत्र्याच्या दबावाखाली काम करत आहेत. हा प्रकार थांबला नाही तर विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवून देऊ, असा इशारा सोमवारी देण्यात आला. कोल्हापूर जिल्हा दिगंबर जैन समाजातर्फे याच कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.सकाळी जिल्हाभरातून दसरा चौकात मोठ्या संख्येने मोर्चेकरी जमले. यानंतर ‘हम सबका एक नारा है, अंतरिक्ष पार्श्वनाथ हमारा है’ यासह अन्य घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी अंतरिक्ष जैन मंदिरात ज्यांना मारहाण झाली त्या अभयकुमार बरगाळे यांनी स्वागत करून अंतरिक्ष मंदिरात सुरू असलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली.ते म्हणाले, श्वेतांबरांचा या मंदिरांशी कोणताही संबंध नव्हता. परंतु व्यापाराच्या नावाखाली काहीजण इथे आले आणि त्यांनी या ठिकाणी दादागिरी सुरू केली. आता येथील मूर्ती, मंदिरे आमचीच आहेत म्हणून ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. माझ्यावर पाच वेळा हल्ले झाले. याबाबत पोलिसांत तक्रार द्यायला गेलो रात्री दीडपर्यंत मला बसवून ठेवण्यात आले. श्वेतांबरांना बोलावून आधी त्यांची तक्रार घेतली गेली. या अन्यायाविरोधात आता राज्यभर आंदोलने करणार आहोत.यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, सावकर मादनाईक, स्वरूपा यड्रावकर, डॉ. पद्माराणी पाटील, विजय पाटील, अमर मार्ले, अशोक बहिरशेट, डॉ. शीतल पाटील, डॉ. शांतीनाथ चौगले, सुरेश भोजकर, भरत वणकुद्रे, संजय कोटावळे, विशाल मिठारी, संदीप ढणाल, सचिन मिठारी, सतीश पत्रावळे, भूषण कावळे, राजू शेटे, अकलंक कमटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर