लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. म्हणून यावेळी हसन मुश्रीफ निवडून येतील असे मलाही वाटले नव्हते. पण ते सर्व समाजाला घेवून विकास कामे करतात. म्हणून ते निवडून आले. मंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात लवकरच राष्ट्रवादीचे स्व मालकीच्या जागेत कार्यालय बांधले जाईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरूवारी दिली.
कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ते पक्ष कार्यालयात बोलत होते. ते म्हणाले, माझे शिक्षण कोल्हापुरात झाले आहे. तालीम कुस्तीचा सराव केला आहे. यामुळे या शहराशी माझे जवळचे नाते आहे. येथील सहकाराचा आदर्श घेवून माझ्या भागात अनेक संस्था उभ्या केल्या. चांगल्या चालवत आहे. यापूर्वीही मी कै. विक्रमसिंह घाटगे, कै. सा. रे. पाटील यांच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा विरोधकांच्या घरात जावून सत्कार न स्वीकारता आपल्या पक्षाच्या कार्यालयात आलो.