शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लंपास: शाहूपुरी पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 17:05 IST

कोल्हापूर : येथील सर्किट हाऊसनजीक एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने चोरून ...

ठळक मुद्देधूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लंपास सर्किट हाऊसनजीकचा प्रकार: शाहूपुरी पोलिसांत तक्रार

कोल्हापूर : येथील सर्किट हाऊसनजीक एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने चोरून नेण्याचा प्रकार मंगळवारी (दि. १) सायंकाळी घडला. याबाबत ग्रेसी रमण मंडलिक (वय ४८, रा. प्लॉट नं. २८, साई हौसिंग सोसायटी, सर्किट हाऊससमोर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ग्रेसी मंडलिक या महिला दूध आणण्यासाठी चालत जात होत्या. त्याच वेळी समोरून दोन युवक काळसर-मोरपंखी दुचाकीवरून आले. मंडलिक यांच्या गळ्याला हिसडा मारून, गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन धूम स्टाईलने ते कदमवाडीच्या दिशेने पसार झाले. मंडलिक यांनी आरडाओरडा केला; पण चोरटे तोपर्यंत निघून गेले होते. याबाबत ग्रेसी मंडलिक यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.चौकट..चोरट्यांचे वर्णनकाळसर-मोरपंखी दुचाकीवरून दोघे चोरटे आले होते. दुचाकी चालकाच्या अंगावर मरुन लायनिंगचा शर्ट होता, तर मागे बसलेल्या चोरट्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, तर पायांत स्पोर्टस शूज असल्याचे वर्णन फिर्यादीने पोलिसांना सांगितले.(तानाजी पोवार)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChain Snatchingसोनसाखळी चोरीkolhapurकोल्हापूर