शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा, कोल्हापूर जिल्हा बँकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:33 IST

कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या दहा बड्या थकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा घेऊन जाण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. संबंधित थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रांसह डिजीटल फलकांच्या माध्यमातून प्रसिद्ध करून त्यांची मालमत्ता लिलावात काढण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे.

ठळक मुद्देथकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा, कोल्हापूर जिल्हा बँकेचे निर्णय: याद्या प्रसिद्धीसह मालमत्ता लिलावात काढणार

कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या दहा बड्या थकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा घेऊन जाण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. संबंधित थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रांसह डिजीटल फलकांच्या माध्यमातून प्रसिद्ध करून त्यांची मालमत्ता लिलावात काढण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे.जिल्हा बॅँकेच्या औद्योगिक कर्ज व ग्रामीण कारागरी योजना समितीची बैठक झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ होते.बँकेची सन २०१७-१८ ची वसुली उत्कृष्ट असतानाही दहा बड्या थकबाकीदार संस्थांनी मात्र बँकेला वसुलीच्या कामात सहकार्य केले नाही; त्यामुळे बॅँकेने आक्रमक भूमिका घेतली असून आता गांधीगिरी मार्गाने दारात ढोलताशे वाजवून थकबाकी भरण्याचे आवाहन करायचे, त्याला प्रतिसाद दिला नाहीतर मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाला. इतर थकबाकीदार संस्थांकडेही वसुलीची अशीच प्रक्रिया राबविली जाणार आहे.

टॉपटेन थकबाकीदार -शेतकरी तंबाखू खरेदी-विक्री संघ, राधानगरी तालुका मका प्रक्रिया (स्टार्च) संस्था, ठिकपुर्ली, विजयमाला देसाई वाहतूक संस्था, मडिलगे ब्रुद्रुक, शेतीमाल प्रक्रिया संस्था हेरवाड, भोगावती शेतकरी कुक्कुटपालन संस्था परिते, हिरण्यकेशी शेतीमाल प्रक्रिया संस्था निलजी, महाराष्ट्र स्टेट को-आॅप. टोबॅको फेडरेशन मार्केट यार्ड कोल्हापूर, मयूर वाहतूक संघ कोल्हापूर, पंत वस्त्रोद्योग प्रोसेस संस्था तिळवणी, एस. के. पाटील बॅँक कुरुंदवाड.

अशी राबवणार वसुलीची प्रक्रिया -पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली जाणार, डिजीटल फलक लावणार, दुसऱ्या टप्प्यात थकबाकीदार संस्था संचालकांची नावे प्रसिद्ध करणार, संस्था पदाधिकाऱ्यांच्या दारात ढोल-ताशांचा गजर, शेवटच्या टप्प्यात मालमत्ता लिलावात काढणार.

 

टॅग्स :bankबँकkolhapurकोल्हापूर