शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

धनगर समाज एकवटला! एस. टी. प्रवर्ग आरक्षणासाठी आरपारची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 02:22 IST

कोल्हापुरात पहिली गोलमेज परिषद : एस. टी. प्रवर्ग आरक्षणासाठी आरपारची लढाई

कोल्हापूर : आतापर्यंत खूप सोसले, येथून पुढे नाही. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच ‘एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण, धनगर सारा एक’ या घोषणेसह संपूर्ण समाज पिवळ्या झेंड्याखाली एकवटेल, असा निर्धार शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत करण्यात आला. ३२ पोटशाखा आणि तितक्याच संघटना व नेत्यांमध्ये विभागलेला समाज येथून पुढे एकमुखाने आरक्षणाचा लढा लढेल आणि जिंकेल, असा ठरावही टाळ्यांच्या गजरात मंजूर झाला. धनगर समाजाला सध्या असलेले एन. टी. आरक्षण एस. टी. प्रवर्गात मिळावे म्हणून आता आरपारची लढाई करण्यासाठी वज्रमूठ यावेळी बांधण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत धनगर आरक्षण समन्वय समितीची गोलमेज परिषद झाली. गांधीजयंतीचा मुहूर्त साधून भरवलेल्या या परिषदेत माजी मंत्री अण्णा डांगे, राम शिंदे यांच्यासह राज्यातील समाजाचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. आपल्यात दुही असता कामा नये, एकजुटीने आवाज उठवला तरच सरकारवर दबाब येणार आहे, अन्यथा कधीही आरक्षण मिळणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशाराही परिषदेने दिला.माजी मंत्री अण्णा डांगे म्हणाले, मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र येतो, मग आपण का नाही? आपणही एकत्र येऊन अडवणूक का होत आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी दबाबगट तयार झाला तरच आरक्षण मिळेल, असे सांगितले.परिषदेतील ठराव1. ‘धनगर सारा एक’ या भावनेतून ३२ पोटशाखा, संघटना एकत्र येणार2. गोलमेज परिषदेची व्याप्ती वाढवण्यासाठी पुन्हा एकदा संघटनांची बैठक3. शेळ्या-मेंढ्या चोऱ्या रोखण्यासह चराई व संरक्षण कायद्याची मागणी4. उच्च न्यायालयातील सुनावणी रोजच्या रोज होऊन निकाली काढावी.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्याMaratha Reservationमराठा आरक्षण