शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

राजकारणाचे जोडे बाहेर, आरक्षणासाठी धनगर सारा एक; ३२ पोटशाखा एका झेंड्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 19:06 IST

Dhangar Reservation News: कोल्हापुरातील पहिल्या गोलमेज परिषदेत निर्धार

कोल्हापूर : आतापर्यंत खूप सोसले, येथून पुढे नाही. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच ‘एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण धनगर सारा एक’ या घोषणेसह संपूर्ण समाज पिवळ्या झेंड्याखाली एकवटेल, असा निर्धार शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत करण्यात आला. ३२ पोटशाखा आणि तितक्याच संघटना व नेत्यांमध्ये विभागलेला समाज येथून पुढे एकमुखाने आरक्षणाचा लढा लढेल आणि जिंकेल, असा ठरावही टाळ्यांच्या गजरात मंजूर झाला. धनगर समाजाला सध्या असलेले एन. टी. आरक्षण एस. टी. प्रवर्गात मिळावे म्हणून आता आरपारची लढाई करण्यासाठी वज्रमूठ यावेळी बांधण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत धनगर आरक्षण समन्वय समितीची कावळा नाका येथील मंगल कार्यालयात गोलमेज परिषद झाली. आपला लढा सनदशीर मार्गाने लढण्यासाठी म्हणून गांधीजयंतीचा मुहूर्त साधून भरवलेल्या या परिषदेत राज्यातील समाजाचे प्रमुख नेते सहभागी झाले. दिवसभर चाललेल्या या परिषदेची सुरुवात सकाळी आरक्षणाचे प्रणेते आणि सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्यास अभिवादनाने झाली.

माजी मंत्री अण्णा डांगे, राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद झाली. आपल्यात दुही असता कामा नये, एकजुटीने आवाज उठवला तरच सरकारवर दबाब येणार आहे, अन्यथा कधीही आरक्षण मिळणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशाराही परिषदेने दिला.समन्वय समितीचे निमंत्रक संदीप कारंडे, रामराव वरकुटे, शशिकांत तरंगे, बयाजी शेळके, राजेंद्र कोळेकर यांनी थेट सहभाग घेतला; तर रामहरी रूपनवर, गणेश ठाके, बबन रानगे, अशोक कोळेकर, कल्लाप्पा गावडे हे व्हीसीद्वारे सहभागी झाले.

माजी मंत्री अण्णा डांगे म्हणाले, मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र येतो, मग आपण का नाही? आपणही एकत्र येऊन अडवणूक का होत आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ही एकट्या-दुकट्याची लढाई नाही, हे नेता होऊ पाहणाऱ्याने लक्षात घ्यायला हवे.

माजी मंत्री राम शिंदे म्हणाले, राज्यघटनेनेच दिलेले आरक्षण न मिळण्यामागे आपल्यातील दुहीच कारणीभूत आहे. नेता, पक्ष, गट-तट बाजूला ठेवून एकत्र आल्याशिवाय सरकारचे डोळ उघडणार नाहीत. आपला दबाबगट तयार झाला तरच आरक्षणाचे फळ मिळेल, अन्यथा नाही.

दिल के टुकडे हजार...

दिल के टुकडे हुए हजार; एक यहां गिरा, एक वहां, अशा काव्यपंक्ती उद‌्धृत करीत अण्णा डांगे यांनी धनगर समाजातील गटबाजीवर परखड भाष्य केले. या वयातही डांगे यांनी आपल्या खास परखड शैलीत नेत्यांना खडे बोल सुनावले.

परिषदेतील ठराव१ ‘धनगर सारा एक’ या भावनेतून ३२ पोटशाखा, संघटना एकत्र येणार

२ गोलमेज परिषदेची व्याप्ती वाढवण्यासाठी पुन्हा एकदा संघटनांची बैठक

३ शेळ्या-मेंढ्या चोऱ्या रोखण्यासह चराई व संरक्षण कायद्याची मागणी

४ उच्च न्यायालयातील सुनावणी रोजच्या रोज होऊन निकाली काढावी

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षण