शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘थेट पाईपलाईन’च्या कामात गौडबंगाल; मोदी, शहा यांच्याकडे चौकशीची मागणी करणार - धनंजय महाडिक

By भारत चव्हाण | Updated: March 13, 2024 14:10 IST

पुईखडी शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन घेतली माहिती

कोल्हापूर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामात प्रथम दर्शनी खूप काही गौडबंगाल व घोटाळा दिसतोय, म्हणून या योजनेची केंद्रीय स्तरावरील तज्ज्ञ समिती मार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा व या खात्याचे संबंधित मंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.खासदार महाडिक यांनी बुधवारी सकाळी सत्यजित कदम तसेच भाजप-ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते यांच्यासह पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.थेट पाईपलाईन योजनेचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आले आहे. परंतू तेथून पुढे नागरिकांच्या घरापर्यंत जाण्यासाठीची वितरण व्यवस्था अस्तीत्वात नाही. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाण्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे मला नागरिकांच्या तक्रारीवरुन या प्रश्नात लक्ष घालावे लागत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.श्रेय घेण्याचा बालिश प्रयत्न या योजनेत केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य सरकारचा २० टक्के निधी खर्च झाला आहे. २० टक्के रक्कम खर्च करुन त्यांनी श्रेय घेण्याच्या प्रयत्न केला आहे. विद्यमान पालकमंत्रीही नाराज झाले आहेत. स्वत:च जाऊन त्यांनी पाण्यात अंघोळ केली. श्रेय घेण्याचा हा बालिश प्रयत्न असल्याचे महाडिक म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक