शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महाडिकांची मुंबई वारी, उमेदवारीची चर्चा भारी; हातकणंगले मतदारसंघात चर्चेला तोंड फुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 13:27 IST

चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधी नव्हे इतकी चर्चा महायुतीच्या उमेदवारांबाबत होत आहे. अशातच खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांना मुंबईला पाचारण केल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा हातकणंगले मतदारसंघात चर्चेला तोंड फुटले. हे तिघेही बुधवारी कोल्हापुरात नसल्याने ही चर्चा आणखीनच वाढली; परंतु या चर्चेत कोणतेच तथ्य नसल्याचेही रात्री स्पष्ट झाले.खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरू झाली असताना दुसरीकडे माने आणि पक्ष निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी माने यांचीच महायुतीची उमेदवारी अंतिम असल्याचे स्पष्ट केले असतानाही बुधवारी संध्याकाळनंतर महाडिक परिवार पुन्हा चर्चेत आला. हसन मुश्रीफ एका कार्यक्रमातून अचानक मुंबईला गेले. खासदार महाडिक आणि अमल, शौमिका यांनाही मुंबईला तातडीने बोलावल्याचे मेसेज सुरू झाले आणि याची खातरजमा करण्यासाठी कार्यकर्ते उतावीळ झाले.

याबाबत अधिक माहिती घेतली असताना खासदार महाडिक हे कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टरप्रमुख असल्याने ते साताऱ्याला गेल्याचे सांगण्यात आले, तर अमल महाडिक हे मंत्रालयात काम असल्याने तिकडे गेले, तर कौटुंबिक कारणामुळे त्यांच्यासोबत शौमिका महाडिक गेल्याचे सांगण्यात आले, तर हसन मुश्रीफ हे दोन दिवसांपूर्वीच मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हातकणंगलेच्या उमेदवारीच्या सुरू झालेल्या फेरचर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.

मी एका सार्वजनिक कामासाठी मंत्रालयात आलो आहे. माझ्या मुंबई भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नाही. -अमल महाडिक, माजी आमदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhatkanangle-acहातकणंगलेPoliticsराजकारणDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकAmal Mahadikअमल महाडिक