कोल्हापूर : शहर आणि परिसराला विजेच्या गडगडाटासह शुक्रवारी रात्री वळीव पावसाने जोरदार झोडपले. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी शहर अंधकारमय झाले. सखल भागात पाणीच पाणी दिसत होते. पावसामुळे काही काळ शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. हवेत गारवा निर्माण झाला होता. गेल्या चार दिवसांपासून हवेत उष्मा वाढला होता. अंगाची लाही-लाही होत होती. शुक्रवारी दुपारनंतर आकाशात ढग जमू लागले. त्यांची गर्दी झाली. सायंकाळी ढग दाटून आले. रात्री आठच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, विजेच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस पडत राहिला. सुमारे एक तास पाऊस झाला. त्यामुळे शहरातील सखल भागांत पाणीच पाणी झाले होते.जोरदार वाऱ्यामुळे लक्ष्मीनगर परिसरात मोठा वृक्ष कोसळला. सानेगुरुजी वसाहतीमध्ये झाडाची फांदी विद्युत वाहिनीवर पडली. वाहिन्या तुटल्या. शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले यांची तारांबळ उडाली. दुचाकी व पादचाऱ्यांनी ज्या ठिकाणी आसरा मिळेल त्या ठिकाणी थांबणे पसंत केले. अनेक पादचारी रिक्षाने घर गाठत होते. त्यामुळे रिक्षेवाल्यांना चांगली मागणी राहिली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. परिणामी उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना काही काळ दिलासा मिळाला. खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीच्या कामांना वेग येणार आहे. पावसामुळे भाताच्या धूळ वाफेच्या पेरण्यांनाही गती येणार आहे. ऊस वाढीसाठी पाऊस अतिशय पोषक ठरला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. (प्रतिनिधी)बियाणे खरेदीसाठी गर्दी होणारमान्सूनच्या तोंडावर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामाची धांदल वाढणार आहे. आज, शनिवारपासून सर्वच कृषिसेवा केंद्रांत बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी होणार आहे.आठवड्यानंतर हजेरीऐन उन्हाळ््यात वळवाने हजेरी लावली. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून वळवाने विश्रांती घेतली होती. आकाशात ढग दिसत होते. मात्र, वळीव चकवा देत होता. शुक्रवारी रात्री मात्र त्याने शहराला चांगले झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस राहून-राहून झोडपत रााहिला.
वळवाने शहराला झोडपले
By admin | Updated: May 30, 2015 00:07 IST