शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गाभाऱ्याजवळून दर्शन घेता जणू आई अंबाबाईची गळाभेटच घडली!, भाविकांमधून समाधान

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 30, 2023 18:02 IST

कोल्हापूर : आम्ही वर्षातून एकदा अंबाबाईच्या दर्शनाला येतो, गेल्या दोन वर्षापासून बाहेरूनच दर्शन व्हायचं आज गाभाऱ्याजवळून दर्शन घेताना देवीचं ...

कोल्हापूर : आम्ही वर्षातून एकदा अंबाबाईच्या दर्शनाला येतो, गेल्या दोन वर्षापासून बाहेरूनच दर्शन व्हायचं आज गाभाऱ्याजवळून दर्शन घेताना देवीचं ते रुप पाहून डोळे भरून आले, असं वाटलं जणू अंबाबाईची गळाभेट घडली.., मी रोज देवीच्या संध्याकाळच्या आरतीला येते पण लांबूनच दर्शन मिळते. पण आज आतून दर्शन सुरू झाले म्हटल्यावर सकाळीच मंदिर गाठले, जवळून आईला बघता आले, मन शांत झालं..अशा शब्दात भाविकांनी गाभाऱ्याजवळून दर्शन सुरू केल्याचा आनंद व्यक्त केला.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाई मंदिरात कोरोनापूर्वी गाभाऱ्याबाहेरील चांदीच्या उंबऱ्यापासून भाविकांना देवीचे दर्शन घडत होते. मात्र कोरोना सुरू झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या कारणास्तव शंखतीर्थ चौकातून दर्शन सुरू करण्यात आले. तेंव्हापासून गेली तीन वर्षे भाविकांना लांबूनच देवीचे पाया पडावे लागायचे आणि घाईने सरकावे लागायचे. सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उद्याचसून चांदीच्या उंबऱ्यापासून दर्शन सुरू केले जाईल अशी घोषणा केली. मात्र आतील परिसरात पितळी रेलिंग लावण्यासह अन्य व्यवस्था करण्यामध्ये एक दिवस गेला.बुधवारी मात्र रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पहाटे मंदिर उघडल्यापासूनच चांदीच्या उंबऱ्यापासून अंबाबाईचे दर्शन सुरू झाले आणि भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. राखीपौर्णिमेचा सण असल्याने परस्थ भाविकांची संख्या तुलनेने कमी असली तरी जवळून दर्शनाचा स्थानिक व परस्थ भाविकांनी लाभ घेतला व दर्शन व्यवस्था पुर्ववत सुरू केल्याबद्दल  समाधान व्यक्त केले. लांबून देवीचे ओझरते दर्शन व्हायचे पण आता गाभाऱ्याजवळून दर्शनाने जणू देवीची गळाभेट घेतल्यासारखे वाटत होते. सालंकृत प्रसन्न मूर्तीचे ते अलौकिक रुप बघताना डोळ्यांचे पारणे फिटले, असे वाटले समोर देवी उभी आहे अशा शब्दात भाविकांनी आनंद व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर