शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दत्तजयंती सोहळ्यासाठी कर्नाटक, गोवा, गुजरातमधून भाविक नृसिंहवाडीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:28 IST

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली. उद्या, शनिवारी (दि.१४) सायंकाळी ५ वाजता ...

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली. उद्या, शनिवारी (दि.१४) सायंकाळी ५ वाजता मुख्य मंदिरात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. दत्त देवसंस्थान व ग्रामपंचायत मार्फत सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दत्त दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात आदी राज्यातून हजारो भाविक नृसिंहवाडीत दाखल झाले आहेत. भाविकांना दर्शनाची सोय व्हावी यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.उद्या, शनिवारी दत्त मंदिरात पहाटे ४ वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा, सकाळी ७ ते १२ यावेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी १२.३० वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी ३ वाजता येथील ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल. दुपारी ४ नंतर श्री नारायणस्वामी महाराजांचे मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात येईल त्यानंतर ४.३० वाजता ह,भ.प.भालचंद्र देव (रा.केज आंबेजोगाई) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी ठीक ५ वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. जन्माकाळानंतर पारंपारिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटणेत येणार आहे. रात्री ९ नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होवून रात्रो उशिरा शेजारती होणार आहे. श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये  यांचे सुयोग हॉल येथे भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.जादा एसटी बसेससह, पोलिसांचा चोख बंदोबस्तभाविकांना दत्त दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शनरांग व्यवस्था, मुखदर्शन, क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, ध्वनीक्षेपक यंत्रणा, सकाळी १० ते रात्री १० पर्येंत मोफत महाप्रसाद, कापडी मंडप, शामियाना, आकर्षक विद्युत रोषणाई, आदी आवश्यक सोयी व सुविधा दत्त देव संस्थान मार्फत करण्यात आली. जादा एसटी बसेससह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पार्किंगची नेमकी व्यवस्था, फेरीवाले नियोजन, आरोग्य केंद्र, स्वच्छता, दिवाबत्ती आदी आवश्यक नियोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच चित्रा सुतार व उपसरपंच रमेश मोरे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdatta jayantiदत्त जयंती