शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आदमापूर येथे बाळूमामांच्या आमावस्या यात्रेला भाविकांची दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2023 21:44 IST

दोन दिवसात तीन लाखांहून अधिक भाविक

बाजीराव जठार, लोकमत न्यूज नेटवर्क वाघापूर: महाराष्ट्र ,कर्नाटक ,गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड)येथे आज सोमवती आमावस्येला दोन दिवसात तीन  लाखांहून अधिक भाविकांनी बाळूमामांचे दर्शन घेतले. आदमापूर हे ठिकाण बाळूमामांच्या मुळे नावारूपाला आले असून महाराष्ट्र तसेच  कर्नाटकातून १८ बग्ग्यातून (कळपातून) फिरत असणारी बाळूमामांची बकरी आदमापूर येथे बाळूमामाच्या भक्तांची गर्दी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. जशी बकरी पुढे फिरत जातात तसे बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे.

भाविकांना  सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाळूमामा देवालय समितीचे प्रशासकीय अध्यक्ष शिवराज नाईकवाडे  यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र, दर्शन लाईन अशा सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. आंबील प्रसाद तसेच भाविकांना अन्नछत्र प्रसादासाठी सहा टन तांदूळ वापरण्यात आला.भक्तांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्थाही केली होती. त्यामुळे वाहन पार्किंगचा प्रश्न हे थोड्या प्रमाणात मार्गी लागला आहे. बाळूमामा देवालयाचे प्रशासकीय अधिकारी तसेच देवालयाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा,  भाविकांनी अथक परिश्रम घेतले.परंतु आदमापूर ते मुदाळतिट्टा तसेच आदमापूर ते वाघापूर पाटीपर्यंत दिवसभरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

सध्या बाळूमामा यांच्या दर्शनाची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अनेक ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या गाड्या आदमापूर येथे मुक्कामी सोडल्या आहेत. त्यामुळे भाविकांची प्रवासाची सोय चांगली झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं