शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:41 IST

दीपावलीनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून मिळालेल्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या करवीरनिवासीनी अंबाबाई देवीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रविवारी तर भाविकांची मांदियाळीच फुलली होती.

ठळक मुद्दे‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळीवाहनांच्या रांगा; यात्री निवासही फुल्ल

कोल्हापूर : दीपावलीनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून मिळालेल्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या करवीरनिवासीनी अंबाबाई देवीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रविवारी तर भाविकांची मांदियाळीच फुलली होती.दीपावलीनिमित्त गेल्या आठवडाभरापासून राज्यातील शाळांना सुट्टी लागली आहे. त्यात सरकारी कार्यालयेही मागील रविवारपासून सलग चार दिवस बंद होती. त्यामुळे करवीरनिवासीनी अंबाबाई देवीच्या दर्शनासह पन्हाळगड, जोतिबा, न्यू पॅलेस, नृसिंहवाडी, आदी ठिकाणी पर्यटक, भाविकांनी मोठी गर्दी केली होती.गेल्या पाच दिवसांपासून भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, शिवाजी चौक, आदी परिसरात खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे फिरताना दिसत होते. वाहतूक व्यवस्थेसाठी शहर वाहतूक शाखेनेही गृहरक्षक दलाच्या जवानांसह विशेष व्यवस्था केली होती.

याकरिता बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम परिसर, सरस्वती टॉकीज, मेनराजाराम हायस्कूल, आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. बिंदू चौक येथे वाहने बाहेर काढताना वाहतुकीच्या कोंडीचे चित्र होते. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कंबर कसल्याने ही कोंडी काही मिनिटांतच दूर होत होती.विशेषत: शनिवारी व रविवारी पहाटे चार वाजल्यापासून सरलष्कर भवन मार्गाद्वारे एक लाख ३० हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. काही भक्तांनी रांगांना असलेली तुडुंब गर्दी पाहता मुखदर्शनाचा लाभ घेतला. अंबाबाईप्रमाणेच वाडी रत्नागिरी येथे जोतिबा डोंगरावर ज्योतिर्लिंग व नृसिंहवाडी येथे नृसिंह सरस्वती दत्त यांच्या दर्शनासाठीही मोठी गर्दी होती.

यात्री निवास, धर्मशाळा, हॉटेल्स  हाऊसफुल्लराज्यासह परराज्यांतील पर्यटकांच्या मोठ्या संख्येमुळे अंबाबाई परिसरातील यात्री निवास, धर्मशाळा, हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली होती. यासोबतच खाद्यपदार्थांच्या गाड्यांसह हॉटेल्स, रेस्टॉरंट गर्दीने फुलली होती. त्यामुळे हॉटेलच्या बाहेर जेवणासाठी प्रतीक्षा करावी लागल्याचे चित्र होते.

 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर