शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील जोतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भक्तांना मारहाण, माफीनाम्यानंतर प्रकरणावर पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:41 IST

हुल्लडबाजी करत असल्याचा दावा 

पोर्ले तर्फ ठाणे : परिते गावातील ग्रामस्थ यात्रेनिमित्त जोतिबा डोंगरावर रविवारी सासनकाठी पूजन करायला गेल्यावर, आरतीदरम्यान काही भक्तांनी हुल्लडबाजी करत आरतीमध्ये अडथळा निर्माण केला. यानंतर जोतिबाच्या पुजाऱ्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना मारहाण केली. या प्रकाराने मंदिरात गोंधळ उडाल्याने कोण कोणाला मारतोय हेच कळत नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी परितेच्या सरपंचांनी देवस्थानकडे माफीनामा लिहून दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.परिते गावची रविवारी यात्रा असल्याने गावातील मानाच्या सासनकाठीचे जोतिबा मंदिरात पूजन करून गावात आणल्यानंतर तीन दिवसांच्या यात्रेस सुरुवात होते. पारंपरिक प्रथेनुसार रविवारी सकाळी परितेहून पाचशेपेक्षा अधिक ग्रामस्थ जोतिबाला सासनकाठी घेऊन आले होते. दरम्यान, रविवारी सकाळी ११ ते १२ च्या वेळेत मंदिराभोवती आरती सुरू असताना सासनकाठी घेऊन प्रदक्षिणा काढताना भक्तांनी आगाऊपणा करायला सुरुवात केली. पुजाऱ्यांसह देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितले. तरीही त्यांनी ऐकून घेतले नसल्याचे देवस्थानचे म्हणणे आहे. त्यांनी मंदिरात गोंधळ घातला तसेच आरती करण्यामध्ये अडथळा निर्माण केला. तसेच काही पुजाऱ्यांच्या अंगावर गुलाल फेकणे, टोप्या उडविणे असा हुल्लडबाजपणा सुरू केल्यावर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पुजाऱ्यांनी काही भक्तांना मंदिरातून ओढून मारहाण केली. हाणामारीच्या भीतीने काही भक्त सैरावैरा पळू लागल्यावर त्यांना शोधून मंदिरात आणून चोप देण्याचा प्रकार सुरू झाला.मंदिराच्या आतील गर्दीत घडणाऱ्या प्रकाराने गोंधळ उडाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी परितेचे सरपंच मनोज पाटील यांनी देवस्थान कमिटीकडे झालेल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून दिल्यानंतर हाणामारीच्या प्रकरणावर पडदा पडला. त्यानंतर सर्व भक्तांना एकत्र करून परतीचा मार्ग धरला.

पारंपरिक पद्धतीने रविवारी परिते गावची यात्रा असल्याने, सुमारे पाचशेवर लोक जोतिबा डोंगरावर सासनकाठी पुजायला घेऊन गेलो होतो. मंदिरात काय घडले याची माहिती नाही; पण तेथील पुजारी आपल्या लोकांना शोधत असल्याची माहिती मिळताच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी देवस्थान कमिटीला घडलेल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून दिला आणि प्रकरणावर पडदा पाडला. - विजय ऊर्फ मनोज पाटील, सरपंच, परिते

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Jyotiba Temple Priests Assault Devotees; Matter Closed After Apology

Web Summary : At Jyotiba Temple, priests assaulted devotees for disrupting prayers. A brawl erupted during the rituals. The village head apologized to defuse the situation.