शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: शाहू समाधिस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा, ९ कोटी रुपये मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 13:10 IST

शाहू स्मृतिदिनी नेत्यांना शाहू समाधिस्थळी येऊ देणार नाही असा इशारा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीने दिला होता

कोल्हापूर : शाहूप्रेमींच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सामाजिक न्याय विभागाने शाहू समाधिस्थळाची जागा नावावर असण्याची अट शिथिल केली आहे. त्यामुळे शाहू समाधिस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी ९ कोटी ४० लाख ५६ हजार १०८ रुपये निधीला मान्यता देण्यात आल्याची माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.या कामासाठी समाधिस्थळाची जागा सामाजिक न्याय विभागाच्या नावे नसणे या तांत्रिक अडचणीमुळे काम सुरू झालेले नव्हते. ही अट सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने शिथिल केली आहे. त्यामुळे शाहू समाधिस्थळाचे विकासकाम कोल्हापूर महापालिकेद्वारे तात्काळ सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी देतील.यामुळे कोल्हापूर व महाराष्ट्रातील शाहूप्रेमींच्या आणि संपूर्ण बहुजन समाजाच्या जिव्हाळ्याचा व अस्मितेचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे. खऱ्या अर्थाने शाहू महाराज यांचे समाधिस्थळाचे सुशोभीकरण करण्याच्या कामास गती येणार आहे. तसेच या समाधिस्थळाच्या संपूर्ण कामकाजावर जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या पर्यवेक्षणाखाली काम सुरू होऊन ते पूर्ण करून घेण्यात येणार आहे.विषय मार्गी या विषयावर तोडगा निघाला नाही तर शाहू स्मृतिदिनी नेत्यांना शाहू समाधिस्थळी येऊ देणार नाही असा इशारा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीने दिला होता. त्याबाबतचे निवेदन ही शुक्रवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपर्यंत हा विषय मार्गी लागेल असे आश्वासन दिले होते. पण शुक्रवारीच हा विषय मार्गी लागला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती