विकास संस्थांच्या सक्षमीकरणातच शेतकऱ्यांचा विकास : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:26+5:302021-06-01T04:17:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विकास संस्था या जिल्हा बँकेच्या कणा असून, त्यांच्या सक्षमीकरणातच शेतकऱ्यांचा विकास असल्याचे प्रतिपादन जिल्हा ...

Development of farmers only through empowerment of development institutions: Hasan Mushrif | विकास संस्थांच्या सक्षमीकरणातच शेतकऱ्यांचा विकास : हसन मुश्रीफ

विकास संस्थांच्या सक्षमीकरणातच शेतकऱ्यांचा विकास : हसन मुश्रीफ

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विकास संस्था या जिल्हा बँकेच्या कणा असून, त्यांच्या सक्षमीकरणातच शेतकऱ्यांचा विकास असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साडेचार कोटी सक्षमीकरण अनुदानाचे वाटप सोमवारी विकास संस्थांना करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, संस्थांच्या व्यवस्थापन व आस्थापना खर्चाचे योग्य प्रमाण, वैधानिक लेखापरीक्षण व वार्षिक सर्वसाधारण सभा वेळेत होणे, कामकाजामध्ये गैरव्यवहार नसणे, वसुलीचे प्रमाण ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असणे, तसेच व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण दोन ते अडीच टक्के मर्यादेत असणे, अशा निकषांची पूर्तता करणाऱ्या संस्था या अनुदानास पात्र झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८७२ संस्था अनुदानास पात्र असून, या संस्थांनी आदर्श मापदंडाचे पालन भविष्यातही करावे.

प्रातिनिधिक स्वरूपात हनुमान विकास, कोपार्डे, श्रीराम-वाशी, शिरोली विकास-शिरोली पुलाची, सदा-हसन-हसूर खुर्द यांना अनुदानाचे वाटप केले. या वेळी बँकेचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने आदी उपस्थित होते.

Web Title: Development of farmers only through empowerment of development institutions: Hasan Mushrif