शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विकसित भारत संकल्प यात्रेस कोल्हापुरातही विरोध, भाजप समर्थक-विरोधकांमध्ये वादावादी 

By भीमगोंड देसाई | Updated: December 14, 2023 16:20 IST

राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली पाठोपाठ कोल्हापुरातही विकसित भारत संकल्प यात्रेस विरोध

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली पाठोपाठ येथील सोन्या मारूती चौकात गुरूवारी केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेला जोरदार विरोध झाला. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद यादव, जीवन बोडके, बिजली कांबळे यांनी विरोध करीत जनतेच्या पैशातून मोदी आणि भाजपचा प्रचार सुरू असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करीत असताना केंद्र सरकार न म्हणता मोदी सरकार असे का फलकावर लिहिले अशी विचारणा त्यांनी करताच यात्रेचे समन्वयक निरूत्तर झाले. यावेळी भाजप समर्थक आणि विरोधकांमध्ये थोडावेळ वादावादी झाली.केंद्र शासन राज्य शासनाच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा शहरातून काढत आहे. यावर नाहक सरकारी निधी खर्च केला जात असल्याचा काही जणाचा आरोप होत आहे. यातून यात्रेला विरोध होत आहे. सोन्या मारूती चौकात यात्रा आल्यानंतर सामाजिक कायकर्ते यादव, बोडके, कांबळे तिथे जावून पोहचले. त्यांनी समन्वयक अधिकाऱ्यांना भेटून प्रश्नांची सरबत्ती केली. केंद्र सरकारच्या योजना असताना मोदींच्या योजना असे का म्हणत आहात ? असे का फलक लावला आहे ? मोदी स्वत: खिशातून प्रचारासाठी पैसे खर्च करीत आहेत का ? असे प्रश्न यादव यांनी समन्वयकांना विचारला. यावर समन्वयकांनी जनतेचा पैसा असल्याचे मान्य केले. जनतेचा पैसा असेल तर मोदी सरकार असे का म्हणता ? अशी विचारणा केल्यानंतर ते निरूत्तर झाले. यावेळी भाजप समर्थक आले. त्यांनी कोणीही विरोध करू शकत नाही, असे म्हणत विरोधकांशी वाद घालू लागले. यावेळी विरोधक आणि समर्थकांत वादावादी झाली. त्यानंतर यादव, बोडके, कांबळे यांनी जनतेच्या पैशातून भाजप, मोदी यांचा प्रचार सुरू असल्याचा आरोप करून निषेध नोंदवला आणि निघून गेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी