शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

देवस्थानने रस्त्यांसाठी निधी द्यावा, सर्वपक्षीय कृती समितीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 11:42 IST

मुसळधार पाऊस आणि महापुराने खराब झालेल्या रस्त्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निधी द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले.

ठळक मुद्देदेवस्थानने रस्त्यांसाठी निधी द्यावा, सर्वपक्षीय कृती समितीचे निवेदन

कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि महापुराने खराब झालेल्या रस्त्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निधी द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यांत पडून बरेच अपघात झाले असून शहरातील नागरिक त्रस्त आहेत. कोल्हापुरात रोज पर्यटक येतात, त्यांनाही याचा त्रास होत आहे. हे रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. मात्र त्यासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे शासनावर अवलंबून राहावे लागत आहे. तरी देवस्थान समितीने रस्त्यांसाठी निधी द्यावा.यावेळी महेश जाधव यांनी या विषयावर देवस्थान समितीच्या बैठकीच सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच जिल्हाधिकारी व आयुक्तांचा सल्ला घेऊन, कायदेशीर बाबींचा विचार घेऊन त्याबाबतचा ठराव करू. त्यानंतर न्याय विधि खात्याकडे प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन दिले. यावेळी देवस्थानचे सचिव विजय पोवार, माजी महापौर आर. के. पोवार, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, बाबा पार्टे, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, किशोर घाटगे, किसन कल्याणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर