शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Terror Attack: कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक काश्मीरमध्ये सुरक्षित, अनेकांचे नियोजन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:49 IST

ढगफुटीमुळे अडकलेले १६ पर्यटक उद्या येणार

कोल्हापूर : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे अतिरेक्यांचा हल्ला झाला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर आणि बेळगावचे सुमारे २०० पर्यटक सध्या या परिसरात पर्यटनासाठी गेले आहेत.संध्याकाळी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याची बातमी दूरचित्रवाणीवर आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या छातीत धस्स झाले. प्रत्येक घरातून सातत्याने त्यांना फोन सुरू झाले. परंतु त्याठिकाणी केवळ पोस्टपेड सेवा सुरू असल्याने अनेकांचे फोन लागू शकले नाहीत. परिणामी, अनेकांच्या नातेवाइकांच्या घरात चिंतेचे वातावरण तयार झाले. सहल संयोजक रवी सरदार यांनी फोन करून ‘लोकमत’ला सांगितले की, बहुतांशी पर्यटक या पहलगामहून सुरक्षितपणे श्रीनगरला पोहोचले आहेत. सर्वजण सुरक्षित आहेत. अनेकांचे फोन लागत नसल्याने नातेवाईक चिंतेत आहेत. परंतु सर्वजण सुरक्षित असून, त्यांची काळजी न करण्याचे आवाहन सरदार यांनी केले आहे.

अनेकांचे नियोजन रद्दया घटनेमुळे कोल्हापूर आणि परिसरातून काश्मीरला जाणाऱ्या अनेकांनी आपली नियोजित सहल रद्द केली आहे. इतका भीषण दहशतवादी हल्ला झाल्याने ज्यांनी खरोखरच जाण्यासाठी आरक्षण केले आहे. त्यांनीही फेरविचार करायला सुरुवात केली आहे. या सर्वप्रकरणी केंद्र शासन नेमका काय निर्णय घेणार आहे, याचीही प्रतीक्षा असल्याचे सहलीवर जाण्यासाठी आरक्षण केलेल्या नागरिकांनी सांगितले.ढगफुटीमुळे अडकलेले १६ पर्यटक उद्या येणारजम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी पावसामुळे अडकलेले कोल्हापूरचे १६ पर्यटक सुरक्षित असून, ते उद्या, गुरुवारी कोल्हापुरात परत येतील, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली. ढगफुटीमुळे रस्ते वाहून गेले असून, रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. तसेच विमानाचे दरही वाढले आहेत. हे पर्यटक आज, बुधवारी विमानाने गोव्यात येतील व कारने गुरुवारी कोल्हापुरात येतील असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन