शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात अवैध गर्भपातात जुन्याच टोळ्या सक्रिय, शासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

By उद्धव गोडसे | Updated: March 25, 2026 13:21 IST

आरोग्य यंत्रणेच्या नियमित तपासणीबद्दल प्रश्न उपस्थित झाले

उद्धव गोडसेकोल्हापूर : वारंवार कारवाया करुनही जिल्ह्यात अवैध गर्भपाताचे अड्डे राजरोस सुरु आहेत. रोज शेकडो कळ्या गर्भात खुडल्या जात असताना, आरोग्य यंत्रणेच्या नियमित तपासणीबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. एजंट आणि डॉक्टरांच्या जुन्याच टोळ्या पुन्हा या गुन्ह्यात सक्रिय होत असल्याने त्यांना कायद्याची भीती नाही, की ठोस कारवाईच होत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.बिद्री येथे श्रद्धा हॉस्पिटलवर पोलिसांनी सोमवारी (दि. २३) रात्री छापा टाकून गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. यापूर्वीच दोनदा गुन्हे दाखल झाल्याने वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द झालेला डॉ. युवराज पाटील या कारवाईत रंगेहाथ सापडला. त्याच्याकडून पोर्टेबल मशीन आणि गर्भपाताची औषधे जप्त केली. हे मशीन त्याने कर्नाटकातून आणल्याची कबुली दिली. औषधे पुरविणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आठ ते दहा एजंट गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी महिलांना त्याच्याकडे पाठवत होते. रोज किमान २५ ते ३० महिलांची तपासणी केल्याच्या नोंदी त्याच्या रुग्ण रजिस्टरमध्ये आहेत. नोंदी नसलेल्या रुग्णांची संख्या मोठी असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

वाचा: दोनवेळा कारवाई, स्वत:चा परवाना निलंबित.. दुसऱ्याच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदावैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियमित तपासणीत जिल्ह्यातील बोगस डॉक्टर, अवैध गर्भलिंग निदान, गर्भपाताचे अड्डे याची काहीच माहिती समोर येत नाही. वर्षभरात केलेल्या कारवायांचीही माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाहीर केली जात नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुलगा असल्यास २०, मुलगी असल्यास ४० हजारडॉ. पाटील याच्या हॉस्पिटलमध्येकोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील रुग्णांची नोंद आहे. गर्भलिंग निदानातून मुलगा असल्याचे स्पष्ट होताच तो २० हजार रुपये घेत होता, तर मुलगी असल्यास ४० हजार रुपये घेत होता. गर्भपातासाठी ३० ते ४० हजार रुपये दर होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, क्रांती पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत.

डॉक्टर, एजंटचा शोध सुरूडॉ. पाटील याच्याकडे जिल्ह्यातील किमान १० एजंट काम करीत होते. कारवाई होताच ते गायब झाले आहेत. काही डॉक्टरही गर्भपातासाठी महिलांना बिद्रीला पाठवत होते. डॉ. पाटील याच्या कॉल डिटेल्समधून एजंट आणि डॉक्टरांची नावे समोर येत आहेत. गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होताच त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन गुन्हे, एक तक्रारअटकेतील डॉ. पाटील याच्यावर यापूर्वी राधानगरी आणि भुदरगड पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. याशिवाय कागल येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडेही एका तक्रार आली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Abortion Racket: Old Gangs Active, Authorities Under Scrutiny

Web Summary : Kolhapur's illegal abortion dens persist despite crackdowns. A doctor was caught red-handed with abortion equipment. Agents and doctors are involved, exploiting women for profit. Authorities' oversight is questioned due to recurring offenses and lack of transparency.