शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: निधी असूनही कामे रेंगाळली, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची सद्य:स्थिती 

By भारत चव्हाण | Updated: February 26, 2025 17:53 IST

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

भारत चव्हाण कोल्हापूर : महानगरपालिकेचे कोणतेही विकास काम निविदेत दिलेल्या मुदतीत पूर्ण होत नसल्याचे अनुभव प्रत्येक कामातून येत आहे. सन २०२० मध्ये ७९ कोटी ९६ लाख खर्चाच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता झाली, परंतु चार वर्षे उलटली, तरी पहिल्या टप्प्यातीलच काम अद्याप अपूर्ण आहे. या कामावर कोणा अधिकाऱ्यांचे वैयक्तिक नियंत्रण नसल्यामुळे कामाची गती मंदावली असल्याने उर्वरित कामे पूर्ण कधी होणार, असा सवाल विचारला जात आहे.एखाद्या व्यक्तीने स्वत:चे घर बांधायला काढले की, केव्हा एकदा पूर्ण होईल आणि त्या घरात राहायला जाईन, याची उत्सुकता लागून राहिलेली असते. पण, अंबाबाई मंदिर परिसर विकास कामांतर्गत होत असलेल्या तळमजल्यासह पाच मजले पार्किंग व सहा व सातव्या मजल्यावरील भक्तनिवासच्या इमारतीबद्दल महापालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्याला काहीच देणे-घेणे राहिलेले नाही. ठेकेदार कोल्हापूरचा आहे आणि त्यांनी तळमळ दाखविली, म्हणून तर पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे झुकलेले आहे.पहिल्या टप्प्यातील काम एक वर्षात पूर्ण करायचे होते, आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामही एक वर्षात पूर्ण करायचे आहे, पण पाच महिने होऊन गेल्यावर आता कुठे तिसऱ्या मजल्याचे स्लॅब जोडायला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. जर अशीच कामाची गती असेल, तर काम पूर्ण होणार कधी आणि त्या इमारतीचा पर्यटक, भाविकांना उपयोग होणार कधी हा प्रश्न आहे.

निविदा, वर्क ऑर्डरमध्ये वर्ष सरलेपहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे गेले की दुसऱ्या टप्प्यातील कामाना निधी सोडला जातो. दुसऱ्या टप्प्यातील सुचविलेल्या कामांकरिता ४० कोटींचा निधी वितरीत करण्यास फेब्रुवारी २०२४ मध्ये मान्यता झाली. त्यानंतर आठ महिन्यांनी म्हणजेच दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. पाच महिन्यांनी कामाला सुरुवात झाली आहे.

दुसऱ्या टप्प्यात ही कामे होणारदुसऱ्या टप्प्यात नव्याने बांधलेल्या वाहनतळ इमारतीत तिसरा, चौथा, पाचवा मजल्यावर पार्किंग आणि सहाव्या व सातव्या मजल्यावर भक्त निवास, तसेच ५० लोक बसतील, असे उपहारगृह या कामांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला होता, परंतु फेब्रुवारीत कामाला सुरुवात झाली आहे.

गाडीअड्डा वाहनतळ सुरुवात नाहीव्हिनस कॉर्नरजवळील गाडीअड्डा येथे वाहनतळ विकसित करण्याच्या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यात समावेश आहे, परंतु या ठिकाणी अद्याप कामालाच हात लागलेला नाही.

कामावर नियंत्रणाचा अभावमहालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंमलबजावणी करण्याकरिता अधिकाऱ्यांनी आठवडा, दोन आठवड्यातून एकदा पाहणी, आढावा बैठक घ्यायला पाहिजे, पण कोणाचेही या कामाकडे लक्ष नाही. कोणावर नियंत्रण राहिलेले नाही. वर्कऑर्डर झाली की, सगळ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. निधी असूनही कामे रेंगळली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर