शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर हद्दवाढीबाबतचे अजितदादा पवार यांचे विधान विनोदीच 

By विश्वास पाटील | Updated: February 10, 2025 17:49 IST

नुसतीच टोलवाटोलवी : निर्णय महापालिकेने नव्हे, सरकारनेच घ्यायचा आहे

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची कार्यवाही महापालिकेने करावी, अशी अजब सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी झालेल्या नियोजन समितीच्या विभागीय बैठकीत केली आहे. त्यांची ही सूचना कोल्हापूरकरांना विनोदीच वाटत आहे. आपल्यावरील जबाबदारी ते महापालिकेवर ढकलत आहेत. आतापर्यंत कोल्हापूरची हद्दवाढ व्हायला हवी होती. या शहराचा विकास झाला असता, असे ते बैठकीत वारंवार म्हणत होते व महापालिका प्रशासकांना उद्देशून हद्दवाढ का करत नाही, अशी विचारणा करत होते. हा निर्णय घेण्याची जबाबदारी राज्यकर्ते म्हणून तुमचीच आहे, हे मात्र सोयीस्कर विसरल्याचे दिसले.कोल्हापूरच्या हद्दवाढीचा गेली तब्बल ३३ वर्षे लोंबकळत पडलेला प्रश्न सुटण्यासाठी कधी नव्हे ती अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याची भावना राज्यात नवे सरकार सत्तेत आल्यावर शहरवासियांची झाली होती. हद्दवाढीशी संबंधित निर्णय घेऊ शकतील असे कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर आणि हातकणंगले या चारही मतदारसंघांत महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. राज्यातही महायुतीचेच सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आले आहे. त्यामुळे आता कोणतीच राजकीय, प्रशासकीय अडचण येणार नाही, असे लोकांना वाटत होते, परंतु त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती कोण दाखवायला तयार नसल्याचे सध्याचे चित्र आहे.आमदार राजेश क्षीरसागर हे पहिल्यापासूनच हद्दवाढ व्हायला हवी या मताचे आहेत. पहिल्या टप्प्यात करवीर मतदारसंघातील फारशी गावे हद्दवाढीत येणार नसतानाही आमदार चंद्रदीप नरके यांचा थेट विरोध आहे. आमदार अमल महाडिक यांची चर्चेतून प्रश्न सुटावा व हद्दवाढ व्हावी, अशी भूमिका आहे, परंतु या दोन्ही परस्पर विरोधी बाबी आहेत. कारण, असे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत, परंतु त्यातून निष्पण्ण काहीच झालेले नाही.ज्येष्ठ आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री होताच निवडक गावे घेऊन हद्दवाढ करणार असल्याची घोषणा केली होती, परंतु त्यांनीही पुढे फारसा उत्साह त्यासाठी दाखवला नाही. नवे पालकमंत्री प्रकाश आबीटकर हे याबाबत काही ठोस भूमिका घेऊ शकतात, परंतु ते अजून सगळ्या गोष्टींचा अंदाज घेताना दिसत आहेत.

दुसऱ्याकडे बोट..उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हात जोडतो; परंतु कोल्हापूरची हद्दवाढ करण्याचे आवाहन दोन वर्षांपूर्वी केले, मात्र पुढे काही झाले नाही.आताही त्यांनी तशीच भूमिका घेतली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांची हद्दवाढ त्यांच्या पुढाकारानेच झाली आणि इथे मात्र ते महापालिका अजून गप्प का आहे, असे विचारत आहेत. राज्यकर्ते म्हणून त्यांनीच हद्दवाढ करायची असताना, ते दुसऱ्याकडे बोट दाखवून कालहरण करत आहेत.

खमकापणा दाखवाच..हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने पाठवा, अशी सूचना नगरविकासमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी २०२१ मध्ये केली होती. परंतु, तेच पुन्हा अडीच वर्षे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. आताही ते याबद्दल फारसे काही बोलायला तयार नाहीत. त्यांनी पालकमंत्र्यांना ताकद दिली, तरच हा निर्णय होऊ शकतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार