शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बाजार समितीत कोट्यवधीच्या ठेवी, सुविधांची वाणवा; रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शेतीमालावर धुळीचे थर

By राजाराम लोंढे | Updated: December 30, 2022 13:22 IST

धुळीचे लोट पसरत असल्याने भाजीपाला, गुळासह सर्व शेतीमालावर धुळीचे थर

राजाराम लोंढेकोल्हापूर : गेली अडीच वर्षे बाजार समितीला तसे कारभारीच नाहीत. अशासकीय मंडळाने आपण काटकसरीचा कारभार कसा करतो?, हे दाखवून नेत्यांकडून पाठ थोपटून घेण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे समितीच्या बँकेत कोट्यवधीच्या ठेवी आहेत, मात्र सुविधा देण्यात हात आखडता घेतला, त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. समिती आवारात चोवीस तास धुळीचे लोट पसरत असल्याने भाजीपाला, गुळासह सर्व शेतीमालावर धुळीचे थर साचलेले असतात.समितीमधील अडते, व्यापाऱ्यांकडून कर घेतला जातो, त्याबदल्यात त्यांना सोयी-सुविधा देणे समिती प्रशासनाला बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे गेली अडीच वर्षे दुर्लक्ष केले आहे. समितीची रोजची उलाढाल सरासरी साडेचार कोटींची आहे. त्यासह इतर बाबींतून समितीला रोज ४ लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी १० टक्केही सोयी-सुविधांवर खर्च केला जात नाही.संचालक मंडळ गेल्यापासून अडीच वर्षांत समितीच्या ठेवीत साडेआठ कोटीने वाढ झाली आहे. बँकेत कोट्यवधीच्या ठेवी आहेत, मात्र सुविधांसाठी एक रुपयाही खर्च केलेला नाही. रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे, एखादे वाहन गेले की धुळीचे लोट उसळतात. समिती आवारात रोज सरासरी १३०० वाहने येतात. त्यामुळे आवारात धुळीचे लोट कधी थांबतच नाहीत. हीच धूळ शेतीमालावर जाऊन बसते. त्याचा परिणामही प्रतीवर होतो, परिणामी दराला फटका बसतो. समितीच्या प्रशासकीय इमारतीवरही धुळीचे थर बसले आहेत.

बोळ अरुंद होऊ लागलेसमितीमधील दोन रस्त्यांना जोडणारे अनेक बोळ आहेत, त्या बोळांची अवस्था तर फारच वाईट आहेत. ते हळूहळू अरुंद होऊ लागले आहेत.

समिती आवार झुडपांनी व्यापलासमिती आवारात अस्वच्छता आहेच, त्याचबरोबर अनेक ठिकाणी झुडपे वाढल्याने रस्तेच गायब झालेले दिसतात. काही अडत दुकानांचे फलकही दिसत नाहीत.

कारभारी येणार तरी कधी?बाजार समित्यांच्या निवडणुका कोरोनापासून लांबणीवर पडल्याने कामकाज पुरते ठप्प आहे. प्रशासकीय मंडळावर काम करण्याच्या मर्यादा येतात. प्राधिकरणाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असती. मात्र, ग्रामपंचायती निवडणुकीमुळे प्रक्रिया थांबल्याने नवीन कारभारी कधी येणार? याविषयी उत्सुकता आहे.

दृष्टिक्षेपात बाजार समिती :रोजची उलाढाल : ४.५० कोटीएकूण रोजचे उत्पन्न : ४.६५ लाखसमिती येणाऱ्या वाहनांची संख्या : सरासरी १३००. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarket yardमार्केट यार्ड