शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

‘कोल्हापूर’, ’हातकणंगले’त ४६ जणांची अनामत जप्त; ‘नोटा’लाच अधिक मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:19 IST

स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचे डिपॉझिट जप्त

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ५० पैकी तब्बल ४६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार वैद्य मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६७ टक्के मते मिळाली पाहिजेत. तरच अनामत रक्कम वाचते; पण या निवडणुकीत प्रमुख चार उमेदवार वगळता सगळ्यांना आपली अनामत वाचवता आलेली नाही. विशेष म्हणजे राजू शेट्टी, डी. सी. पाटील यांनाही अनामत रक्कम राखता आलेली नाही.निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६७ टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याचे डिपॉझिट जप्त केलं जातं. एखाद्या उमेदवाराला १६.६७ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याचं डिपॉझिट त्याला परत केलं जातं. एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव त्याची उमेदवारी रद्द झाल्यास, त्याने जमा केलेलं डिपॉझिट परत दिलं जातं. याशिवाय विजयी उमेदवारांनासुद्धा डिपॉझिट परत मिळतं.या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसचे शाहू छत्रपती, शिंदेसेनेचे संजय मंडलिक या प्रमुख उमेदवारांसह २३ जण रिंगणात होते. तर ‘हातकणंगले’ मतदारसंघात शिंदेसेनेचे धैर्यशील माने, उध्दवसेनेचे सत्यजित पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह तब्बल २७ जण रिंगणात हाेते. कोल्हापूर मतदारसंघात १३ लाख ८६ हजार २३० मते झाली होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पराभूत उमेदवारांना किमान २ लाख ३१ हजार ८४ मते मिळणे गरजेचे होते. शाहू छत्रपती व संजय मंडलिक वगळता इतर एकही उमेदवार जवळपासही पोहचलेला नाही. हातकणंगलेत १२ लाख ९० हजार ७३ मते झाली, त्यानुसार किमान २ लाख १५ हजार ५५ मते मिळणे बंधनकारक आहे.

विशेष म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रमुख दोन ‘हातकणंगले’ मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारानंतर नोटाला मते अधिक मिळाली आहेत.खाडेंची झेप ४ हजारापर्यंतचकाँग्रेसच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत आग्रही राहिलेले बाजीराव खाडे यांना पराभव पत्कारावा लागला. त्यांना जेमतेम ४ हजारापर्यंत झेप घेता आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालVotingमतदान