शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे पावणेपाच कोटी कोल्हापूर जिल्ह्यातील बाराशे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 11:23 IST

राज्य सरकारच्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँक व बँक आॅफ इंडियाकडे पात्र ११८२ शेतकऱ्यांचे ४ कोटी ७४ लाख ८८ हजार रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बॅँक, बँक आॅफ इंडियाकडे पैसे वर्ग पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास दुसरी ग्रीन यादी गुरुवारी पोर्टलवर प्रसिद्ध होण्याची शक्यता

कोल्हापूर ,दि. ०२ : राज्य सरकारच्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँक व बँक आॅफ इंडियाकडे पात्र ११८२ शेतकऱ्यांचे ४ कोटी ७४ लाख ८८ हजार रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.

गेली पाच महिने कर्जमाफीचे घोंगडे भिजत राहिले आहे. आॅनलाईन अर्ज, त्यानंतर निकषांनुसार छाननी, त्यात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्ष कर्जमाफीस विलंब होत गेला. विरोधकांबरोबरच शेतकऱ्यांमधूनही कर्जमाफीबद्दल असंतोष व्यक्त केल्याने शासकीय यंत्रणा हडबडली.

गेल्या आठ दिवसांत नवीन यंत्रणा कामाला लावून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर टाकण्यास सुरुवात केली. तालुका पातळीवर त्याची छाननी केल्यानंतर तातडीने पैसे वर्ग करण्याची सहकार विभागाची तयारी आहे.

मंगळवारी आयटी विभागाने पात्र ठरविलेल्या याद्यांनुसार राज्य सरकारने आयसीआसीआय बँक, पुणे येथे राज्यातील ८९६ कोटी रुपये जमा केले. तेथून प्रत्येक जिल्हानिहाय पात्र शेतकरी व त्यांचे पैसे अशा याद्या जिल्हा बँका व राष्ट्रीय बँकांना पाठविण्यात आल्या.

कोल्हापूर जिल्हा बँकेलाही मंगळवारी पैसे आले पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते वर्ग झाले नाही. बुधवारी पूर्तता केल्यानंतर दुपारी १०३२ शेतकऱ्यांचे ३ कोटी ७९ लाख रुपये वर्ग झाले. त्याचबरोबर बँक आॅफ इंडियाकडील १५० शेतकऱ्यांचे ९५ लाख ८८ हजार रुपये जमा झाले.

कर्जमाफीच्या याद्यातील गोंधळामुळे पैसे कधी येणार याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. बाराशे शेतकऱ्यांचे का असेना पण पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दुसरी ग्रीन यादी गुरुवारी पोर्टलवर प्रसिद्ध होण्याची शक्यता असून त्याचे कामही जलदगतीने करण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे.

जुलै २०१७ परतफेड करणारेच पात्रप्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या दोन्ही वर्षांतील कर्जाची जुलै २०१७ अखेर परतफेड करायची आहे; पण ऊसपट्ट्यात परतफेडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा बॅँकांसह सर्वच यंत्रणेने सातत्याने सहकार विभागाला कळविले तरी आता यावर विचार करण्यास ते तयार नाहीत.

अनुदान योजनेची माहिती भरताना जुलै २०१७ पर्यंत पैसे भरले की नाही? ज्यांनी भरले त्यांनाच पात्र म्हणून पुढे याद्या पाठवा, अशा स्पष्ट सूचना सहकार विभागाला वरिष्ठ कार्यालयाकडून आल्याने गुंता वाढणार आहे.

असे जमा झालेत पैसेबँकेचे नाव                         शेतकऱ्यांची संख्या                               रक्कमजिल्हा बँक                                      १०३२                              ३ कोटी ७९ लाखबँक आॅफ इंडिया                               १५०                                ९५ लाख ८८ हजार 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक