शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

विठुनामाच्या जयघोषात पन्हाळगडची दिंडी उत्साहात पंढरपूरला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:57 IST

कोल्हापूर, दि. २४: पुंडलिक वरदा हरि विठ्ठलच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात पन्हाळगडची पायी वारकरी दिंडी मोठ्या उत्साही वातावरणात पंढरपूरला रवाना झाली. पहाटे चार वाजता गडावरील महालक्ष्मी, मारुती आदि दैवतांचे दर्शन घेऊन दिंडीप्रमुख उमेश कुलकर्णी, ह.भ.प. राजेंद्र परिट बुवा आणि मिलिंद बांदिवडेकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडीने प्रयाण केले. यंदा दिंडीचे चवथे वर्ष ...

ठळक मुद्देपन्हाळगडच्या दिंडीचे यंदा चवथे वर्ष शल्यविशारद डॉ. बी. आर. कोरे यांच्यासह २५ जणांचा सहभाग दिंडी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पोचेल

कोल्हापूर, दि. २४: पुंडलिक वरदा हरि विठ्ठलच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात पन्हाळगडची पायी वारकरी दिंडी मोठ्या उत्साही वातावरणात पंढरपूरला रवाना झाली. पहाटे चार वाजता गडावरील महालक्ष्मी, मारुती आदि दैवतांचे दर्शन घेऊन दिंडीप्रमुख उमेश कुलकर्णी, ह.भ.प. राजेंद्र परिट बुवा आणि मिलिंद बांदिवडेकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडीने प्रयाण केले. यंदा दिंडीचे चवथे वर्ष आहे.

दिंडीच्या पहिल्या दिवशी वाघबीळ, माले, केखले, जाखले, बहिरेवाडी, नवे पारगाव, तळसंदे, वाठार असा पायी प्रवास करुन दिंडी भादोले येथे मुक्कामी थांबली. पहाटे चार वाजता निघालेली दिंडी सकाळी साडेसात वाजता माले येथे पोचली. माले येथे तेथील रहिवासी पोलिस निरीक्षक धुमाळे यांनी दिंडीचे स्वागत केले. तेथे काकडआरती करुन दिंडी पुढे मार्गस्थ झाली.

केखले येथे बाळासाहेब कदम यांनी दिंडीचे स्वागत करुन वारकऱ्यांना आपल्या निवासस्थानी अल्पोपहार दिला. दुपारी एक वाजता दिंडी तळसंदे येथे पोचली. तेथे सरिता पांगे यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. थोडावेळ विश्रांती घेऊन, भजन करुन दिंडी वाठारमार्गे भादोले येथे मुक्कामी पोचली.

दिंडीमध्ये कोल्हापूर येथील प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. बी. आर. कोरे, सौ. कोरे यांच्यासह २५ जणांचा सहभाग आहे. महिलांचा सहभागही लक्षणीय आहे. दिंडीच्या पहिल्या दिवशीच्या पन्हाळा ते वाठार या २६ किलोमीटरच्या प्रवासात कोल्हापूरचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, कवयित्री डॉ. सई लळीत सहभागी झाले होते. मजल दरमजल करीत दिंडी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पोचेल. 

टॅग्स :Pandharpurपंढरपूरkolhapurकोल्हापूर