कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य व किटकनाशक विभागामार्फत शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणा करीता डास-अळींचे सर्वेक्षण सुरु असून गुरुवारी या मोहिमेत २८६० घरे तपासण्यात आली. या घरामध्ये वापरासाठी साठविण्यात येणारे ४५९८ कंटेनर तपासले. यामध्ये दुषित ११ ठिकाणी डास-अळी आढळल्या. दुषित आढळलेल्या ठिकाणी अळीनाशक टाकण्यात आले आहे.महापालिकेच्यावतीने खाजगी एजन्सी मार्फत २५ बिडिंग चेकर्स् नेमणेत आले आहेत. आरोग्य निरीक्षक, मुकादम, डासअळी सर्व्हेक्षण कर्मचारी यांचे सोबत या बिडींग चेकर्सनी घोडके वाडी, विश्वकर्मा बिल्डिंग, सफारी पार्क, आंगण अपार्ट.,अनंतरपुरम, बापट कॅम्प, अथर्व ओंकार अपार्टमेंट,भुई गल्ली, मुक्त सैनिक बाग, गणेश कॉलनी, मदन पाटील गल्ली, इंद्रजीत कॉलनी, भुईराज सोसायटी, देव गल्ली, प्रिन्स गल्ली, स्वामी गल्ली, जाधववाडी इत्यादी ठिकाणी डास-अळीचे सर्व्हेक्षण करण्यात आले.डेंग्यू, चिकुनगुनिया ची लक्षणे आढळलेस महानगरपालिका आरोग्य विभाग व शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
डेंग्यू सर्वेक्षण सुरुच, ११ ठिकाणी आळ्या सापडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 20:13 IST
dengue Kolhapur- कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य व किटकनाशक विभागामार्फत शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणा करीता डास-अळींचे सर्वेक्षण सुरु असून गुरुवारी या मोहिमेत २८६० घरे तपासण्यात आली. या घरामध्ये वापरासाठी साठविण्यात येणारे ४५९८ कंटेनर तपासले. यामध्ये दुषित ११ ठिकाणी डास-अळी आढळल्या. दुषित आढळलेल्या ठिकाणी अळीनाशक टाकण्यात आले आहे.
डेंग्यू सर्वेक्षण सुरुच, ११ ठिकाणी आळ्या सापडल्या
ठळक मुद्देडेंग्यू सर्वेक्षण सुरुच, ११ ठिकाणी आळ्या सापडल्यादुषित आढळलेल्या ठिकाणी अळीनाशक