शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अनधिकृत मदरशाचे बांधकाम उतरवण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:28 IST

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे उभारण्यात आलेल्या मदरशाचे बांधकाम आज गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मुस्लीम समाज स्वत: उतरवणार असल्याची ...

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे उभारण्यात आलेल्या मदरशाचे बांधकाम आज गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मुस्लीम समाज स्वत: उतरवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी दिली. तर, आज गुरुवारी सकाळपासून मदरशाचे हे बांधकाम उतरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही शासनाची वर्ग २ ची जमीन असून बेकायदेशीर खरेदी-विक्री व शर्तभंग झाल्याने अशी वास्तू संरक्षित करण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे मदरसा उतरवून घ्या व त्यानंतर नियमाने परवानगी घेऊन नव्याने उभारणी करा, असा समजूतदारपणे निर्णय झाला आहे. जमिनीसंबंधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी काल झालेल्या बैठकीत सांगितले.लक्षतीर्थ वसाहतीत शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला मदरसा पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. याविरोधात मुस्लीम समाजाने केलेली स्थगितीची मागणी बुधवारी न्यायालयाने फेटाळली. हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव व मुस्लीम बांधवांचा रोष या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी तसेच मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, तौफिक मुलाणी, जाफरबाबा यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते. यानंतर बैठकीतील निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी पत्रकारांना दिली.जिल्हाधिकारी म्हणाले, आज सकाळी ८ वाजता मुस्लीम समाज स्वत: मदरसा उतरवायला सुरुवात करेल. त्यांना महापालिकेचे कर्मचारी मदत करतील. जमीन वर्ग २ मधील असून मालक शासन आहे. १९९७ साली जमिनीचा व्यवहार करताना परवानगी घेतलेली नाही. न्यायालयानेदेखील ही निदर्शने नोंदवत मदरसा उतरवून घेण्याचा निकाल दिला आहे. नव्याने प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. त्यानुसार मदरसा उभारण्यासाठी समाजाने जमीन वर्ग १ करून रितसर परवानगी घ्यावी त्यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल.न्यायालयातूनही दिलासा नाहीयावेळी मुस्लीम समाजाने या प्रकरणावर २ तारखेला सुनावणी आहे. तोपर्यंत प्रशासनाने कारवाई थांबवावी, अशी विनंती केली. मात्र यावर जिल्हाधिकारी म्हणाले, त्या जमिनीचे हस्तांतरणच बेकायदेशीर झाल्याने न्यायालयातूनही दिलासा मिळणार नाही. उलट समाजात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. सामंजस्याने स्वत:हून मदरसा उतरवून घेतल्यास चांगला संदेश समाजामध्ये जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.आज कोल्हापूर बंद नाहीकोल्हापूर आज गुरुवारी कोल्हापूर बंदची कोणत्याही संघटनेने घोषणा केलेली नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यवहार नियमितपणे सुरळीत राहणार आहेत. दरम्यान साेशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप, व्टिटरसारख्या सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या, अवमानकारक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो अथवा संदेश प्रसारित करू नयेत अन्यथा माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर