शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईची भीती दाखवून व्यापाऱ्याकडून लाचेची मागणी, निपाणीतील आयकर अधिकारी पाच लाखांची लाच घेताना जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:12 IST

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अंकली (ता.चिक्कोडी) येथील सोन्याचे दागिने विक्रीच्या व्यापाऱ्याला कारवाईची भीती दाखवून पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या ...

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अंकली (ता.चिक्कोडी) येथील सोन्याचे दागिने विक्रीच्या व्यापाऱ्याला कारवाईची भीती दाखवून पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला शुक्रवारी जेलची हवा खायला पाठवण्यात हुपरी (ता. हातकणंगले) येथील कर सल्लागार (सीए) कृष्णा बोरचाटे (मूळ गाव पोहाळे, ता.पन्हाळा) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.अविनाश टोणपे (रा.बेळगांव) असे अटक केलेल्या त्या प्राप्तिकर अधिकाऱ्याचे नाव आहे. बेळगाव येथील केएलईएस डेंटल कॉलेजच्या आवारात ही कारवाई झाली. टोणपे हा आयकर विभागाच्या निपाणी कार्यालयात काम करतो.बेळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकलीतील माणकापूर ज्वेलर्सचे मालक परशुराम विठ्ठलसा बंकापूर यांचा विविध दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी अविनाश चार दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात गेला. तुमच्याकडून दहा हजार रुपयांचा कर कमी भरला असल्याचे सांगून तुमच्या व्यवहारांची खोलात जाऊन चौकशी केल्यास जेलची हवा खायला लागेल, अशी भीती घातली. त्यामुळे बंकापूर यांनी याबाबत बोरचाटे यांना माहिती दिली व पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला.बंकापूर यांच्याकडे पाच लाखांची लाच मागितल्याचा टोणपे याच्यावर आरोप आहे. त्यानंतर, बंकापूरने सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) नारायण बर्मणी यांच्याशी संपर्क साधला आणि प्राप्तिकर अधिकाऱ्याच्या कथित छळाची माहिती दिली. बर्मणी यांनी एक पथक तयार करून खासगी गणवेशात सापळा रचला. बंकापूर यांच्याकडून पाच लाख रुपये स्वीकारताना टोणपे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकBribe Caseलाच प्रकरण