शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साखर मागणीकडे शेतकऱ्यांची पाठ, ‘गुरूदत्त’ वगळता एकाही कारखान्याकडे अर्ज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 14:05 IST

साखर कारखान्यांनी उर्वरित एफआरपीऐवजी साखर घेण्याच्या केलेल्या आवाहनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ‘गुरूदत्त’ कारखान्याकडे एकमेव अर्ज आला असून, उर्वरित कारखान्याकडे एकही अर्ज आलेला नाही.

ठळक मुद्देसाखर मागणीकडे शेतकऱ्यांची पाठ‘गुरूदत्त’ वगळता एकाही कारखान्याकडे अर्ज नाही

कोल्हापूर : साखर कारखान्यांनी उर्वरित एफआरपीऐवजी साखर घेण्याच्या केलेल्या आवाहनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ‘गुरूदत्त’ कारखान्याकडे एकमेव अर्ज आला असून, उर्वरित कारखान्याकडे एकही अर्ज आलेला नाही.एफआरपीची रक्कम देऊ शकत नसल्याचे सांगत जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उर्वरित एफआरपीच्या रकमेपोटी साखर देण्याची तयारी दर्शवली आहे. तसे आवाहन कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे. शेतकऱ्यांची पीक कर्जाबरोबरच मध्यम मुदतीची कर्जे असतात.

एफआरपीतील ८० टक्के रकमेतून शेतकऱ्यांची कर्ज खाती पूर्ण झालेली नाहीत. उर्वरित कर्जाचा प्रश्न असून, ही कर्जे भरण्यासाठी कारखान्यांनी दिलेली साखर एकतर विकास संस्थांना दिली पाहिजे अथवा साखरेची बाजारात विक्री करून येतील त्या पद्धतीने संस्थांकडे जमा केले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच विकास संस्थाही अडचणीत येणार आहेत.दरम्यान, साखर घेऊन जाण्याच्या कारखान्यांच्या आवाहनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. ‘स्वाभिमानी’ने साखर स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही त्यांचा प्रभावक्षेत्र असलेल्या शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील कारखान्यांकडे साखरेची मागणी दिसत नाही. शुक्रवारपर्यंत दत्त, शिरोळकडे एकाही शेतकऱ्यांने अर्ज केलेला नाही. ‘गुरूदत्त, टाकळीवाडी’कडे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल मादनाईक यांनी अर्ज केल्याचे समजते.वस्तुविनिमय पद्धतीची आठवणपूर्वी लोकांकडे आर्थिक चलन नसल्याने आपल्याकडे उपलब्ध असलेली वस्तू दुसऱ्यांला देऊन त्याच्याकडून हवी असलेली वस्तू घेतली जायची. सध्या पैशाऐेवजी साखर देण्याच्या तयारीने पूर्वीच्या वस्तुविनिमय पद्धतीची आठवण होत आहे.

मागणी नाही केली तर मिळतील त्यावेळी पैसेसाखर कारखाने एफआरपीच्या कायद्यातून सुटका करून घेण्यासाठी धडपडत आहेत. साखर आयुक्तांच्या परवानगीने उर्वरित एफआरपीपोटी त्यांनी साखर देण्याची तयारी दर्शवली. शेतकऱ्यांनी साखर स्वीकारली नाही तर कारखान्याकडे पैसे उपलब्ध झाल्यानंतर ‘लवकरच’ दिले जातील, असे म्हटले आहे. त्यामुळे ‘लवकरच’ म्हटले तरी कारखान्यांना मिळतील त्यावेळीच शेतकऱ्यांच्या हातात हे पैसे पडणार आहेत.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर