शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

‘श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ’ नामकरण करण्याची मागणी

By admin | Updated: January 13, 2015 00:13 IST

शिरोलीतील ‘जय भवानी, जय शिवाजी’ संघटनेचा मोर्चा

कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठा’चे नाव बदलून ते ‘श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ’ असे करावे, या मागणीसाठी शिरोली पुलाची येथील ‘जय भवानी, जय शिवाजी’ संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आला. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.दुपारी साडेबाराच्या सुमारास शिरोेली येथील जय भवानी, जय शिवाजी संघटनेचे कार्यकर्ते मोटारसायकल रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या ठिकाणी काहीकाळ जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला. यानंतर जय भवानी, जय शिवाजी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत खवरे व छत्रपती प्रतिष्ठानचे संतोष कांदेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन सादर केले.शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून शिवाजी विद्यापीठाचा कारभार इंग्रजीमध्ये रऌकश्अखक वठकश्एफरकळया नावानेच चालू आहे. जवळपास ५० वर्षे होत आली तरी ही चूक कुठल्याही जाणकार व्यक्तीच्या किंवा इतिहासतज्ज्ञांच्या लक्षात आली नाही. येथील इतिहास विभागातून अनेकांनी डॉक्टरेट मिळविली आहे. त्या लोकांना देखील ही चूक कशी काय लक्षात आली नाही? याबाबत नवल वाटते. शिवाजी विद्यापीठ म्हणजे ‘शिवाजी’ या नावाने अनेकांनी जन्म घेतला. त्यांच्या नावाचे हे विद्यापीठ समजायचे का? असा सवाल करत हा विषय गांभीर्याने घेऊन या विद्यापीठाचे नाव ‘श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ’ करण्यासंदर्भात आपली मागणी शासनाला कळवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. मोर्चात जोतिराम पोर्लेकर, उत्तम पाटील, सरदार मुल्ला, शिवाजी उन्हाळे, अतुल सोडगे, अजिंक्य पाटील, मन्सूर नदाफ, राहुल अनुसे, रवी यादव, भगवान पाटील, नंदू माने, स्वरूप नवले, महंमद महात, संग्रमा खवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते (प्रतिनिधी)प्र-कुलगुरूंना निवेदन....जिल्हाधिकारी कार्यालयातून आंदोलनकर्ते शिवाजी विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी याठिकाणी देखील घोषणाबाजी केली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये ते थांबून राहिले. याठिकाणी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे उपस्थित होते.