शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अंगणवाडी टाळेप्रकरणी चौकशीची मागणी

By admin | Updated: July 8, 2015 00:01 IST

आठ-दहा बालकांचीच शाळेला हजेरी

नेसरी : सरोळी (ता. गडहिंग्लज) येथे शनिवारी (दि. ४) अंगणवाडी शाळा इमारतीस उपसरपंचांनी लावलेल्या कुलूपप्रकरणी अंगणवाडी सेविका मंगला पाटील यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे निवेदन देऊन झाल्या प्रकाराची चौकशी करावी व आपल्याला न्याय मिळावा, अशी विनंती केली आहे. दरम्यान, याबाबत अंगणवाडी पर्यवेक्षिका कुमुदिनी देसाई यांनीही या प्रकाराचा लेखी अहवाल वरिष्ठांना कळविला आहे, तर सरोळी ग्रामस्थ व पालकांमध्ये चिमुरड्यांना होणाऱ्या नाहक त्रासाबद्दल विचारणा होत आहे.शनिवारी उपसरपंच मनोहर सुतार यांनी अंगणवाडी क्रमांक २७१ येथे जाऊन सकाळची शाळा सुरू असताना अंगणवाडी सेविका, मदतनीस व चिमुरड्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप लावण्याचा प्रकार केला होता. शनिवारी सकाळची शाळा त्यांनी ग्रामपंचायत व्हरांड्यात भरवली होती. रविवारी सुटीचा दिवस असल्याने गावात या प्रकारची केवळ चर्चा सुरू होती. मात्र, ‘लोकमत’ने प्रत्यक्ष जाऊन या धक्कादायक प्रकाराची माहिती घेतली. त्यानुसार ‘लोकमत’मध्ये ‘सरोळीत अंगणवाडीला टाळे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. बालमनावर जेथे संस्कार केले जातात आणि त्यांच्यासमोरच स्थानिक राजकारणातून हा प्रकार घडल्याने बालमनावर काय परिणाम होईल याची जराही तमा न बाळगल्याची खंत ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. (वार्ताहर)आठ-दहा बालकांचीच शाळेला हजेरीगेले दोन दिवस अंगणवाडीमधील २२ पैकी ८-१० बालकांनीच हजेरी लावली आहे. मात्र, इतर बालके शाळेला गेली की नाही, का दुसऱ्या अंगणवाडीत दाखल झाली. याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती मागवावी किंवा बालके घरी असल्यास ती शाळेला येण्यास का नकार देत आहेत, याचीही माहिती घेणे गरजेचे आहे.सरोळीतील अंगणवाडी इमारतीमधील चिमुरड्यांसह सेविका व मदतनीस यांना बाहेर काढून कुलूप लावण्याचा प्रकार हा गैरसमजातून घडला आहे. संबंधित प्रकाराबाबत माहिती व अहवाल प्राप्त झाला असून या प्रकाराची कल्पना पं. स. सभापतींना दिली आहे. गेले दोन दिवस शाळा अंगणवाडी इमारतीमध्ये भरत आहे. - पी. बी. जगदाळे, सहा. गटविकास अधिकारी, पं. स. गडहिंग्लज