शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रश्नी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचे आश्वासन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 17:13 IST

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच ...

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तर, वित्त विभागाशी संबंधित विषयांबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रश्नी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने कोल्हापुरातील बिंदू चौकात राज्यस्तरीय बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. काल, बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी ग्रामविकास विभाग सकारात्मक निर्णय घेईल, असे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, किमान वेतन, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के कर्मचाऱ्यांची पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती, 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या आधारे सफाई कर्मचाऱ्यांना मेहनताना देणे आदी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतHasan Mushrifहसन मुश्रीफ