शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढप्रश्नी पालकमंत्री हटावची मागणी, कोल्हापुरात कृती समितीची जोरदार निदर्शने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 12:16 IST

उद्योगमंत्री सामंत यांचे उत्तर चुकीचे, दिशाभूल करणारे व ते सुद्धा विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान ही बाब गंभीर स्वरूपाची

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात महिन्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही ते न पाळणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात कोल्हापूर शहर हद्दवाढ व समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दुपारी निदर्शने केली. कोल्हापूरकरांचा अपमान करणाऱ्या केसरकर यांच्याकडील पालकमंत्रिपदाचा कार्यभार काढून घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.शहराच्या हद्दवाढीसंदर्भात कोणताही निर्णय होत नसल्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचे कृती समितीने ठरविले होते. आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हद्दवाढ समर्थक व विरोधक अशा दोन्ही बाजूंची बैठक घेतली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर केसरकर यांनी महिन्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. परंतु, महिना होऊन गेला तरी बैठक आयोजित केली नाही, म्हणून कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी हे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या माध्यमातून पाठवावे अशी विनंतीही केली. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी विधिमंडळात मंत्री उदय सामंत यांनी हद्दवाढीची भूमिका स्पष्ट केली आहे, याकडे लक्ष वेधले तेव्हा कृती समितीचे सदस्य काहीसे संतप्त झाले.उद्योगमंत्री सामंत यांचे उत्तर दिशाभूल करणारे उद्योगमंत्री सामंत यांचे उत्तर चुकीचे, दिशाभूल करणारे व ते सुद्धा विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या नाहीत. निवडणूक केव्हा होणार याचे उत्तर आजही कोणी देऊ शकत नाही. वास्तविक स्वतःला अभ्यासू म्हणणारे व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणणाऱ्या पालकमंत्री केसरकर यांनी उद्योगमंत्री सामंत यांचे विधान बरोबर नाही, असे म्हणायला पाहिजे होते, पण त्यांनी तसे म्हटले नाही, असे बाबा इंदूलकर यांनी सांगितले. माजी महापौर आर. के. पोवार, दिलीप देसाई, अशोक भंडारे, बाबा पार्टे, अनिल कदम, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, चंद्रकांत पाटील यांनी निदर्शनात भाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्रीDeepak Kesarkarदीपक केसरकर