शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांच्याकडून शाहू महाराजांचे जाणीवपूर्वक अवमूल्यन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 13:03 IST

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराज यांचे अवमूल्यन केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बुधवारी पत्रकातून केला. फडणवीस यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही पक्षाच्यावतीने करण्यात आली.

ठळक मुद्देफडणवीस यांच्याकडून शाहू महाराजांचे जाणीवपूर्वक अवमूल्यनराष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप : माफी मागण्याची मागणी

कोल्हापूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराज यांचे अवमूल्यन केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बुधवारी पत्रकातून केला. फडणवीस यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही पक्षाच्यावतीने करण्यात आली.बुधवारी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. यामध्ये शाहू महाराज यांचा उल्लेख  थोर सामाजिक कार्यकर्ते असा केला आहे. फडणवीस यांना खऱ्या अर्थाने शाहू महाराज कळले नाहीत. शाहू महाराज हे पुरोगामी चळवळीचे अर्ध्वयू होते. त्यामुळे प्रतिगामी शक्ती नेहमीच त्यांचा द्वेष करतच आल्या आहेत.

फडणवीस यांनी शाहू महाराज यांचा केलेला एकेरी उल्लेख हेसुद्धा त्याचेच द्योतक आहे. शाहू महाराज हे दूरदृष्टीचे, समतेचे व लोककल्याणकारी असे महान ऋषितुल्य राजे असताना त्यांचा उल्लेख कार्यकर्ते असा एकेरी होणे हा आम्हा जनतेचा अवमान आहे.

हा अवमान शाहूप्रेमी जनता कदापिही सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ, आदिल फरास आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस