शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा  : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:42 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद बिद्रे व राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा संगिता अल्फान्सो यांची कायमस्वरुपी नियुक्त करा : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद बिद्रे व राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सहायक पोलीस निरीक्षक बिद्रे यांचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील आणि कुरुंदकरचा मित्र फळणीकर, कारचालक अशा चौघांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या अजय कदम करीत आहेत. त्यांना सरकारी वकीलांनी माहिती देण्यासाठी बोलविले असता गुन्ह्यामध्ये मृतदेह मिळालेला नाही.

पुरावे भक्कम नाहीत, त्यामुळे तुम्ही ही केस घेवू नका. बिद्रेच्या मृत्यच्या दाखल्याचा अहवाल महानगरपालिकेकडे देण्यासाठी नकार दिला आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे मी ३०२ खूनाचा गुन्हा दाखल असलेबाबतचा स्पष्ट अहवाल देणार नाही असे सांगितले. कुरुंदकरच्या घरामध्ये व अश्विनी बिद्रे यांच्या फलॅटमध्ये मिळालेल्या वस्तु देण्याचे आदेश झाले असताना त्या पूर्णत: दिलेल्या नाहीत. कदम यांचे संशयित करुंदकरचा भाऊ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांचे घनिष्ठ संबध आहेत. त्यामुळे सर्वोच न्यायालयाकडे अभय कुरुंदकर याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याठिकाणीसुध्दा सरकारी वकीलांना चुकीचा माहिती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशयिताला जामीन होवू शकतो.

बिद्रे यांच्या खूनाचा तपास तांत्रिकबाबीवर आहे. त्याचे ज्ञान कदम यांना नसल्याने ते जाहीरपणे आरोपी सुटतील अशी भाषा करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला या तपासावरुन हटवावे, अशी मागणी शासनाला आम्ही केली असल्याचे बिद्रे-गोरे कुटूंबियांनी सांगितले.बिद्रे हत्यांकाडाचा निकाल हा अलिबाग (रायगड) सत्र न्यायालयाने एक वर्षांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नियमित सुनावणीसाठी, सरकारी वकीलांसह साक्षीदारांना माहिती करण्यासाठी या हत्येचा तपास संगिता अल्फान्सो यांचेकडे द्यावे. खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांचेकडेच राहावा, अशी मागणी केल्याचे बिद्रे-गोरे कुटूंबियांनी पत्रकारांना सांगितले.अश्विनी बिद्रे हत्या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी बिद्रे-गोरे कुटूंबियांनी शासनाकडे केली होती. परंतू निकम हे मूळचे जळगावचे आहेत. या गुन्ह्यातील दोन नंबरचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजेश पाटील हा खडसे यांचा भाचा आहे. ते जळगावचे आहेत.

निकम यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजिवकुमार यांना सांगितले की, पोलीसांच्या विरोधामध्ये आजपर्यंत मी लढलो नाही. त्यामुळे हा खटला मी घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे निकम हे या खटल्याचे वकील म्हणून आम्हाला नको आहेत. दूसऱ्या वकीलांचे नाव आम्ही दिले असल्याचे आनंद बिद्रे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणkolhapurकोल्हापूर