चंदगड :
कोवाड (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीपात्रात दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे किणी हद्दीतील बाजारपेठ व आजूबाजूची शेती क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. नदीपात्रात बंधाऱ्याला लागून दोन्ही बाजूला अतिक्रमणे हटवून नदीला येणाऱ्या पुराचे नियोजन करावे, नदीपात्रात बांधलेले मंदिर व सांडपाण्यासाठी गटर बांधकाम केल्यामुळे एका बाजूचे चार बर्गे बंद झाले आहेत.
हे अतिक्रमण हटवून नदीपात्राशेजारील शेतकऱ्यांना सहकार्य करावे जेणेकरून पुढील काळातील होणाऱ्या नुकसानीला आळा बसावा, अशी मागणी किणी गावचे सरपंच संदीप बिर्जे व ग्रामस्थांनी आमदार राजेश पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
यावेळी उपसरपंच अप्पा हुंदळेवाडकर, जॉन लोबो, संजय कुट्रे, ग्रा. पं. लक्ष्मण पाटील, गजानन कुंभार, यशवंत बिर्जे, संतोष वेग, वसंत सुतार, किणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व्ही. के. दळवी, सचिव संदीप सुतार, दीपक कालकुंद्रीकर, प्रवीण गणाचारी, रणजित गणाचारी, शशिकांत बिर्जे, दिनकर पाटील, श्रीकांत पाटील, जोतिबा बिर्जे आदी उपस्थित होते.
* फोटो ओळी : ताम्रपर्णी नदीतील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात चंदगड येथे आमदार राजेश पाटील यांना किणी ग्रामस्थांनी निवेदन दिले.
क्रमांक : २९०३२०२१-गड-०६