शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

भाजपला हरवणे हेच पहिले टार्गेट - डी राजा 

By विश्वास पाटील | Updated: February 21, 2024 16:04 IST

मोदींना वाटते की लोकांचा विचार हायजॅक करता येतो

कोल्हापूर : भाजप देशासाठी विनाशकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. देश आर्थिक संकटात सापडला आहे. तरीही भाजप आरएसएसच्या आदेशानुसार काम करीत आहे. त्यांची विचारधारा जात, धर्म, प्रदेशामध्ये फूट पाडणारी आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार डी. राजा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले, देशात हुकूमशाही वाढते आहे. आपण आपले स्वातंत्र्य गमावत जात आहे. मोदी पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा करीत आहे. मात्र, ते पराभूत होऊ शकतात. आम्ही इंडिया आघाडीसोबत आहे. जागा वाटपात आम्हालाही स्थान द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजप हटाव, देश बचावसाठी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत. राष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. आघाडीसोबत येण्यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. भाजपला पराभूत करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे.भाजपला हुकूमशाही शासन हवे आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे असंविज्ञानिक असल्याचे घोषित केले आहेत. यामध्ये पारदर्शकता नव्हती.निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएम यंत्रावर शंका उपस्थित केली जात आहे. सर्व मतांची व्हीव्हीपॅटवरून मतमोजणी करावी, अशी आमची मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोदी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. भूकबळी वाढत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगाराचे प्रश्न गंभीर बनले आहेत.

वन नेशन वन निवडणूक विरोधातडी राजा म्हणाले, वन नेशन वन निवडणूक संविधान संघ राज्याच्या विरोधात आहे. ते अव्यवहार्य आहे. संसदीय व्यवस्था रद्द करणे हे भयंकर आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया