शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणात मराठा समाजाच्या अतिक्रमणाचा डाव हाणून पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 17:38 IST

OBC Reservation Kolhapur- घटनेने ओबीसी समाजाला दिलेल्या ५२ टक्के आरक्षणात मराठा, जाट यांच्यासारखा क्षत्रीय, जमिनदार समाजाचा शिरकाव करण्याचा डाव देशभर सुरु आहे, तो खऱ्या ओबीसींनी संघटीतपणे हाणून पाडावा, असे आवाहन श्रमिक ओबीस महासंघाचे श्रावण देवरे यांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही, द्यायचेच आहे तर ईडब्लूएसची आरक्षण मर्यादा १० वरुन २५ टक्केपर्यंत वाढवावी आणि खुशाल द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देओबीसी आरक्षणात मराठा समाजाच्या अतिक्रमणाचा डाव हाणून पाडाश्रावण देवरे यांचे आवाहन: कोल्हापुरात पहिली ओबीसी आरक्षण परिषद

कोल्हापूर: घटनेने ओबीसी समाजाला दिलेल्या ५२ टक्के आरक्षणात मराठा, जाट यांच्यासारखा क्षत्रीय, जमिनदार समाजाचा शिरकाव करण्याचा डाव देशभर सुरु आहे, तो खऱ्या ओबीसींनी संघटीतपणे हाणून पाडावा, असे आवाहन श्रमिक ओबीस महासंघाचे श्रावण देवरे यांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही, द्यायचेच आहे तर ईडब्लूएसची आरक्षण मर्यादा १० वरुन २५ टक्केपर्यंत वाढवावी आणि खुशाल द्यावे, असेही त्यांनी सांगितले.कोल्हापुरात शनिवारी श्रमिक ओबीसी महासंघातर्फे शाहू स्मारकमध्ये पहिली ओबीसी सक्षमीकरण परिषद झाली. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसह सहकारी संस्थातील प्रतिनिधीत्व व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीचे १८ ठराव एकमताने मंजूर झाले.परिषदेचे अध्यक्ष म्हणून बोलताना नाशिकचे श्रावण देवरे म्हणाले, ओबीसी समाज कायम दुर्बलच राहावा, असे जाणिवपुर्वक प्रयत्ना होताना दिसत आहे. मराठा, जाट हा बलवान समाज आहे, ते ओबीसीमध्ये आले तर खरे ओबीसी आपोआपच मागे पडणार आहेत. देशातील ५२ टक्के असणाऱ्या या बहुजन समाजाच्या दृष्टीने हे घातक असल्यानेच आता ओबीसी समाजाने हक्कासाठी अधिक जागरुक राहिले पाहिजे. एसईबीसी म्हणजेच ओबीसी आहे, फक्त शब्दांचा छल करुन ओबीसींना फसवले जात असल्याचेही देवरे यांनी सांगितले.स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना डॉ. आनंद गुरव यांनी आरक्षणामुळे का असेना गावात ओबीसी पद, मान मिळत आहे, पण उच्च समाजातील लोक अजूनही पद देऊन उपकार केल्याची भाषा वापरत असल्याचे चित्र असल्याचे सांगत ओबीसीनी स्वाभिमानाने आणि अभिमानाने लोकशाहीने दिलेल्या हक्काचा वापर करावा असे सांगितले.परिषदेतील प्रमुख ठराव

  • ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी
  • ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे
  • मराठा आरक्षणाला पाठींबा पण ओबीसीतून नको
  • धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, विणकरांना ओबीसीत घ्या
  • सहकारी नोकरी व संस्थामध्ये ओबीसी प्रतिनिधी घ्या
  • बढतीतील आरक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करा
  • बँकांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा करण्यास सांगा

 

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणkolhapurकोल्हापूर