शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची बदनामी, कोल्हापुरातील व्यंकटराव हायस्कूलवर कारवाई करा; विधान परिषदेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:34 IST

पत्रावर मुख्याध्यापकांची सही व शिक्का

कोल्हापूर : मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या महाराष्ट्रात अस्तित्वातच नसलेल्या योजनेबद्दल सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करून राज्य शासनाची बदनामी केल्याबद्दल इचलकरंजीच्या व्यंकटराव हायस्कूलवर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेत बुधवारी नागपूरचे आमदार संजय जोशी यांनी केली. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भातील सोशल व्हायरल प्रसिद्ध झाले होते. पीठासन अधिकाऱ्यांनी या प्रकाराची राज्य शासनाने नोंद घेऊन संबंधित शाळेकडून स्पष्टीकरण मागवावे अशा सूचना केल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेली योजनेसंबंधीची माहिती या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे यांनी जास्तीत जास्त पालकांना लाभ व्हावा, या हेतूने टायपिंग करून घेतली. त्यावर हायस्कूलचा शिक्का मारून स्वत:च्या सहीने नोटीस फलकावर लावली. कुणीतरी पालकांनी त्याचा फोटो काढून ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पालकांत गोंधळ उडाला. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. महाराष्ट्र शासनाची अशी योजनाच नसल्याने या योजनेबद्दल माहिती देऊन लोकांत गैरसमज पसरविण्याचे काम संबंधित हायस्कूलने केल्याची बाब आमदार जोशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. या पत्रावर मुख्याध्यापकांची सही व शिक्काही असल्याने तेच याला जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.राज्य शासनाकडून अस्तित्वात नसलेल्या योजनेची जाहिरात शाळेच्या नोटीस बोर्डवर लावून शासनाची व पालकांची दिशाभूल व फसवणूक केली. त्यामुळे अशी खोटी माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल मुख्याध्यापिका कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे यांना दिले.

मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे यांना या प्रकाराबद्दल कारणे दाखवा नोटिसा बजावली आहे. त्यांनी कोणत्या नियमान्वये ही माहिती प्रसारित केली याचा खुलासा मागविला आहे. - सुहास वाईंगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कोल्हापूर.