शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : केंद्र सरकारने दखल घ्यावी, खासदार संभाजीराजेंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 12:42 IST

बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. या संपूर्ण प्रकाराची केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी करावी.

कोल्हापूर : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ही ट्विट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तर या प्रकरणाची केंद्र आणि कर्नाटक सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.खासदार संभाजीराजे म्हणाले, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. या संपूर्ण प्रकाराची केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी करावी. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान या घटनेनंतर कोल्हापूरसह सांगली, मिरज परिसरात संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकचे फलक असलेले सर्व व्यवसाय बंद पाडले. मिरजेत तर कर्नाटकच्या गाड्या फोडल्या. यामुळे तणावाचे वातावरण बनले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी शहरातील सर्वच मुख्य चौकात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजKarnatakकर्नाटकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती