शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नव्या संसदेसाठी कोल्हापूरच्या ‘सांगलीकरां’चे योगदान; पितापुत्रांनी केले ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर काम 

By समीर देशपांडे | Updated: September 21, 2023 12:15 IST

केवळ १५ दिवसांत करून दिले काम

समीर देशपांडेकोल्हापूर : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर ‘सेंट्रल व्हिस्टा’ या नवीन इमारतीमध्ये भारताच्या संसदेचे कामकाज सुरू झाले. ही इमारत बांधण्याआधीपासूनच चर्चेत आली होती. या बहुचर्चित इमारतीच्या बांधकामामध्ये खारीचा वाटा कोल्हापूरमधील अभियंता, कारखानदार दीपक सांगलीकर आणि गौरव सांगलीकर यांच्या कंपनीने उचलला आहे.या इमारतीसाठी जे अष्टकोनी स्तंभ उभारायचे होते. त्याचे साचे तयार करायचे होते. या कामाचा ठेका घेतलेल्या टाटा प्रोजेक्टसकडून यासाठी येथील गोकुळ शिरगाव लघु औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या दीपक सांगलीकर यांच्या ‘टेक्नोज न प्लास्टोज’ कंपनीकडे ऑक्टोबर २०२१ मध्ये विचारणा करण्यात आली. हे काम घेतल्यानंतर जे कामासाठी किमान ६ ते आठ आठवडे लागतात. ते काम सांगलीकर आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केवळ १५ दिवसांत करून दिले.हे साचे इतक्या उत्तम दर्जाचे बनवले होते की या अष्टकोनी स्तंभांचे ‘फिनिशिंग’ चांगले आणि अतिशय कमी कालावधीत झाल्याचा अभिप्राय सांगलीकर यांना मिळाला. देशाच्या इतिहासात मोठे स्थान मिळवणारी ही इमारत उभी करण्यामध्ये आपले योगदान म्हणून सांगलीकर पितापुत्रांनी हे काम ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर करून आपली मानसिकताही यातून दाखवून दिली. अशा पद्धतीने कोल्हापूरच्या कारखानदारांनाही या इमारतीच्या बांधकामामध्ये योगदान देता आले.

एल ॲन्ड टी कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्याकडे काम करून घेतले होते. ते सध्या या टाटा प्रोजेक्टसमध्ये काम करतात. त्यांनीच या कामासाठी आमच्या कंपनीची निवड केली. देशाच्या संसद भवनाच्या इमारतीच्या कामामध्ये आम्हांला खारीचा वाटा उचलता आला याचे समाधान आणि अभिमान वाटतो. - दीपक सांगलीकर, गौरव सांगलीकर, 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरParliamentसंसद