शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
2
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
3
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
4
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
5
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
6
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं
7
ट्रम्प यांचा PM मोदींशी फोनवरून संवाद; ट्रेडवर चर्चा, रशियन तेल खरेदीसंदर्भा पुन्हा मोठा दावा!
8
"शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला...", ऐन दिवाळीत घडली दुर्घटना
9
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
10
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
11
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
12
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
13
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
14
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
15
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
16
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
17
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
18
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
19
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
20
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता

गोविंद पानसरे स्मारकाचे जानेवारीमध्ये लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 10:56 IST

govindpansare, samark, satejpatil, meeting, muncipaltycarportaton, kolhapurnews ज्येष्ठ कामगार नेते ॲड. गोविंद पानसरे यांचे स्मारक दर्जेदार केले जाणार असून यासाठी निधी कमी पडू देणार नाही. जानेवारीमध्ये स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देगोविंद पानसरे स्मारकाचे जानेवारीमध्ये लोकार्पण पालकमंत्र्यांनी घेतला आढावा : डिसेंबरअखेर स्मारक पूर्ण करण्याचे आदेश

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते ॲड. गोविंद पानसरे यांचे स्मारक दर्जेदार केले जाणार असून यासाठी निधी कमी पडू देणार नाही. जानेवारीमध्ये स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. अजिंक्यतारा येथील कार्यालयात स्मारकाच्या कामाचे सादरीकरण आणि आढावा बैठक झाली. महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थित होती.पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पानसरे स्मारकाच्या म्युरल वर्कचे (शिल्प) काम दर्जेदारच झाले पाहिजे. आतापर्यंत १८ लाख खर्च झाला असून पुढील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.सतीशचंद्र कांबळे, आर्किटेक्ट राजेंद्र सावंत, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी कामाची माहिती दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिल्पकार किशोर पुरेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधून माहिती घेतली. फायबरमध्ये शिल्प केल्यास २० दिवसांत शक्य असल्याचे पुरेकर यांनी सांगितले होते परंतु त्याऐवजी थोडावेळ लागला तरी चालेल परंतु ब्राँझमध्येच शिल्प करण्याचा निर्णय झाला.यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, पानसरे स्मारक समितीचे चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, गिरीष फोंडे, प्रशांत आंबी, सुनीता अमृतसागर, मुकंद कदम, शंकर काटाळे, आरती रेडेकर, दिलदार मुजावर उपस्थित होते.काळजी नको, सहा महिने निवडणूक लागत नाही.मनपा पदाधिकाऱ्यांमुळेच काम जलद गतीने झाले. त्यांच्या कार्यकालात लोकार्पण व्हावे. १५ नोव्हेंबरला त्यांची मुदत संपत असून त्याअगोदर काम पूर्ण होऊन लोकार्पण व्हावे, असे सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले. यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, काळजी करू नका, पुढील सहा महिने महापालिकेची निवडणूक लागत नाही.

 कोल्हापुरामध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या कामासंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, सचिन पाटील, संजय मोहिते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील