शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाळंतपणातील मृत्यूच्या प्रमाणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 16:40 IST

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात जून २०१६ ते जून २०१७ या वर्षभरामध्ये ३३ हजार ५३८ गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अभियानामुळे जिल्ह्यातील बाळंतपणामध्ये होणाºया मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. २०१४-१५ मध्ये बाळंतपणामध्ये ४० महिलांचा मृत्यू झाला होता. मात्र २०१६/१७ मध्ये हे प्रमाण २१ पर्यंत कमी झाले आहे.

ठळक मुद्दे‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना’चा परिणामसाडेतेहतीस हजार गरोदर महिलांची तपासणी७४ प्राथमिक, २० ग्रामीण आणि महानगरपालिकेचे ११ रूग्णालयामधून सेवा राज्यात कोल्हापूर तिसºया क्रमांकावरमातृत्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती

समीर देशपांडे

कोल्हापूर, दि. १८ : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात जून २०१६ ते जून २०१७ या वर्षभरामध्ये ३३ हजार ५३८ गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अभियानामुळे जिल्ह्यातील बाळंतपणामध्ये होणाºया मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. २०१४-१५ मध्ये बाळंतपणामध्ये ४० महिलांचा मृत्यू झाला होता. मात्र २०१६/१७ मध्ये हे प्रमाण २१ पर्यंत कमी झाले आहे.

जून २०१६ पासून या योजनेला सुरुवात झाली. गरोदर महिलेला प्रसूतिपूर्व काळात चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २० ग्रामीण आणि उपजिल्हा रूग्णालये आणि महानगरपालिकेचे ११ दवाखाने यामधून ही सेवा दिली जाते.

प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला या गरोदर महिलांना या आरोग्य संस्थांमधून ही सेवा दिली जाते. याआधी या महिलाही सवडीप्रमाणे दवाखान्यात जायच्या आणि अनेकवेळा डॉक्टरही असतील याची खात्री देता येत नसे. परंतू आता तारीख निश्चित करण्यात आल्याने महिलांना आणि डॉक्टरांनाही नियोजन करणे सोपे झाले आहे. यातील अनेक महिलांना खाजगी स्त्रीरोगतज्ज्ञांनी सेवा दिली असून रक्त वाढण्याच्या इंजक्शनपासून संपूर्ण संदर्भ सेवा मिळत असल्याने सुलभ प्रसुतीसाठी ही योजना पूरक ठरत आहे.

या अभियानासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार उपाध्यक्ष आहेत. जिल्हा शल्य चिकि त्सक डॉ. एल. एस. पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाडकर या सर्वांनी या अभियानाला गती दिली.

योजनेचा उददेश

१ गरोदरपणातील दुसºया व तिसºया तिमाहीतील सर्व गरोदर महिलांना उच्च दर्जाची प्रसुतीपूर्व सेवा देणे, तपासण्या करणे व समुपदेशन करणे.

२ आरोग्य सेवेपासून वंचित गरोदर मातांचा शोध घेउन आरोग्य सेवा देणे

३ जोखमीच्या गरोदर महिलांचा शोध घेतल्याची खात्री करून वेळेत व आवश्यक उपचार करणे

४ खाजगी वैद्यकीय, व्यावसायिक, समाजसेवी संघटना, अशासकीय संस्थांचा सहभाग घेणे

५ गरोदर माता सेवांची व्याप्ती वाढवून मातामृत्यु दर व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.

या होतात तपासण्या

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, एचआयव्ही चाचणी, रक्तातील साखरेचे प्रमाण आणि व्हीडीआरएल या तपासण्या यावेळी करण्यात येतात. याशिवाय रक्तवाढीसाठी इंजक्शनही देण्यात येते. तपासणीनंतर आवश्यक ते उपचार केले जातात. जे उपचार स्थानिक पातळीवर शक्य नसतात त्यासाठी उपजिल्हा आणि जिल्हा रूग्णालयांमध्ये संदभर्सेवा दिली जाते

अभियानकाळातील आकडेवारी

महिना                     तपासलेल्या गरोदर महिला                   अतिजोखमीच्या महिला

जून २०१६                                 २८७६                                     १३४जुलै                                           २३०५                                     ७९७आॅगस्ट                                      २११३                                    ६९२सप्टेंबर                                      १३६६                                    ३०८आक्टोंबर                                   २११३                                   ७२०नोव्हेंबर                                      २३७६                                  ४३२डिसेंबर                                       ३०८५                                  ६३१जानेवारी  २०१७                         ३१६२                                   ७२२फेब्रुवारी                                      ३०५०                                   ६१२मार्च                                           ३१२१                                   ६०७एप्रिल                                         ३१८४                                  ५०२मे                                                ३५५१                                 ४४५जून                                               ३७४२                               ६०७एकूण                                           ३३५३८                             ६७७१

खाजगी डॉक्टरांचे सहकार्यया अभियानामध्ये खाजगी स्त्री रोग तजञांनी योगदान द्यावे असे अपेक्षित आहे. यासाठी ४९ डॉक्टरांनी तयारी दर्शवली. प्रत्यक्षात ४० जणांना यासाठी काम करण्याची संधी मिळाली. मात्र आजरा, चंदगड, कागल, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात खाजगी स्त्री रोग डॉक्टरांनी या अभियानाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

राज्यात कोल्हापूर तिसºया क्रमांकावरया अभियानामध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांनंतर कोल्हापूरचा नंबर लागला आहे. या दोन शहरांनंतर अनेक मोठी शहरे महाराष्ट्रात असताना कोल्हापूरने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला आहे.