शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी यादीचे पुनरीक्षण करण्यासंदर्भात जुलैअखेर निर्णय

By संदीप आडनाईक | Updated: June 1, 2025 21:07 IST

मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती शुक्रे यांचे मराठा समाजाला आश्वासन

संदीप आडनाईक

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिनियम २००५ नुसार कलम ९ आणि कलम ११ नुसार महाराष्ट्रातील ओबीसी यादीचे पुनरीक्षण करण्यासंदर्भातील सकल मराठा समाजाने केलेल्या मागणीवर जुलैअखेर सम्यकपणे निर्णय देउ असे आश्वासन राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी रविवारी दिले.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शुक्रे यांची शासकीय विश्रामगृहावर रविवारी सकल मराठा समाजातर्फे ॲड. बाबा इंदूलकर, महादेव पाटील, संदीप देसाई, सुशील भांदिगरे, अनिल घाटगे, दिलिप देसाई, अनिल कदम आदींनी भेट घेतली. यावेळी त्यांनी इंदिरा सहानी खटल्याचा निकाल, जयश्री लक्ष्मण पाटील यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यातील परिच्छेद २७० तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यातील परिच्छेद १७६ नुसार ओबीसी यादीचे पुनरीक्षण करावे, प्रगत झालेल्या समूहाला वगळावे तथा अप्रगत समूहाचा समावेश करावा या मागणीचे निवेदन शुक्रे यांच्याकडे दिले आणि यावर तातडीने निर्णय देण्याची मागणी केली.

राज्यात २००५ मध्ये गठित केलेल्या महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाने या अधिनियमातील प्रकरण तीनमध्ये दिलेल्या अधिकारानुसार कलम ९ आणि कलम ११ मध्ये राज्याच्या ओबीसी सूचीचे दर दहा वर्षांनी नियतकालिन पुनरीक्षण करण्याची मागणी केली म्हटले आहे. राज्याच्या ओबीसी यादीत कुठलाही इन्फीरिकल आणि क्वाटिफायेबल डाटा नसताना अनेक जाती घातल्या आहेत. त्यामुळे या यादीतील जे इतर मागासवर्ग राहिलेले नाहीत अशा वर्गांना या यादीतून वगळावे अथवा नवीन मागासवर्गीयांचा त्यात अंतर्भाव करण्याचे बंधन आहे. परंतु राजकीय कारणामुळे आयोगाने याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाचा ओबीसी यादीत समावेश झालेला नाही असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर शुक्रे यांनी आयोगाच्या येत्या बैठकीत या निवेदनावर संयुक्तपणे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

...तर वादळ उठेल

ओबीसी यादीचे पुनरावलोकन करण्याची सकल मराठा समाजाने केलेली मागणी अध्यक्षांनी तत्वत: मान्य केली. परंतु यावर वादळ उठेल पण कायद्याचे राज्य आहे, पुनरावलोकन करावेच लागेल अशी टिप्पणी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती