शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

किचन ट्रॉली बनवून देण्याचे आमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 20:55 IST

घरामध्ये किचन ट्रॉली बसवून देण्याची सोशल मीडियावर आॅनलाईन जाहिरात करून भामट्याने कोल्हापुरातील डॉक्टर, वकिलांसह शासकीय अधिकाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित भामटा सुनील मारुती कुंभार (रा. साळोखे पार्क) याच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याची चाहूल लागताच तो पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देकिचन ट्रॉली बनवून देण्याचे आमिषाने फसवणूकभामट्यावर गुन्हा, सोशल मीडियावर आॅनलाईन जाहिरात

कोल्हापूर : घरामध्ये किचन ट्रॉली बसवून देण्याची सोशल मीडियावर आॅनलाईन जाहिरात करून भामट्याने कोल्हापुरातील डॉक्टर, वकिलांसह शासकीय अधिकाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित भामटा सुनील मारुती कुंभार (रा. साळोखे पार्क) याच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याची चाहूल लागताच तो पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.पोलिसांनी सांगितले, संशयित सुनील कुंभार याने सोशल मीडियावर महालक्ष्मी फर्निचर आणि इंटेअिरतर्फे स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, फरशी फिटिंग, प्लंबिंग, वायरिंग व रिन्युएशन करून मिळेल, अशी जाहिरात केली आहे. त्याचे कार्यालय राजेंद्रनगर येथे असल्याचा पत्ता त्याने दिला आहे. त्यावरील नंबरवरून गरजू लोक संपर्क साधत होते.

डॉ. दीप्ती सर्वेश कुलकर्णी (रा. न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) यांनी त्याच्याशी संपर्क साधून त्याला आॅर्डर दिली. तो घरी येऊन किचनची मापे घेऊन गेला. त्यानंतर १८ हजार रुपये खर्च सांगून डॉ. कुलकर्णी यांच्याकडून १५ हजार रुपयांचा धनादेश घेऊन गेला.

तो बँकेतून त्याने वटवून पैसे काढून घेतले. त्यानंतर त्यांनी वारंवार त्याला किचन ट्रॉली बसविण्यास सांगितले असता तो टाळाटाळ करू लागला. त्याला एक-दोन वेळा शाहूपुरी पोलीस ठाण्यात बोलावून लेखी लिहून घेत समजही दिली; परंतु त्याने किचन ट्रॉली बसवून दिली नाही. संशयित कुंभार याने डॉक्टर, वकिलांसह शासकीय कर्मचाऱ्यांना सुमारे लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.तक्रारदारांना धमकीसंशयित कुुंभार याच्याकडे लोक किचन ट्रॉली बसवून न दिल्याने पैसे परत करण्याची मागणी करीत होते. त्यांना तो पैसे मागितले किंवा पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत होता. त्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार देण्याचे धाडस कोणी करीत नव्हते.

संशयित सुनील कुंभार याने कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे. त्याच्या धमकीला कोणी घाबरू नये.श्रीकृष्ण कटकधोंड, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर