शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शिरोली-उचगांव उड्डाण पूलादरम्यान रस्त्याची उंची वाढवण्यासाठी डिसेंबरअखेर प्रस्ताव

By संदीप आडनाईक | Updated: December 8, 2023 19:12 IST

नागरी कृती समितीची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

कोल्हापूर : शिरोली ते उचगांव उड्डाण पूलादरम्यान पिलर उभारुनच रस्त्याची उंची वाढवावी तसेच पूर्वीच्या रस्त्यासाठी घातलेला भराव काढून पुराचे पाणी वाहून जाण्यास मार्ग मोकळा करुन दयावा, अशी मागणीराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदारकर यांच्याकडे शुक्रवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. यासंदर्भात म्हणणे ऐकून घेउन या प्रकल्पाच्या कामाचे सर्वेक्षण करुन नियमावलीनुसार पुर्नअंदाजपत्रक तयार करण्याचा प्रस्ताव ३१ डिसेंबरपर्यंत पाठवण्याचे आश्वासन पंदारकर यांनी आंदोलकांना दिले.दरम्यान, केंद्रीय परिवहन व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी भराव न टाकता पिलर उभारुनच उंची वाढविण्याचे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना प्राधिकरणाला दिले आहे. त्याची पुर्तता करुन या महामार्ग विस्तारीकरण कामाचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणीही कृती समितीने केली आहे. उजळाईवाडी येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात प्रकल्प संचालक पंदरकर यांची शुक्रवारी कृती समितीने भेट घेउन चर्चा केली.कोल्हापूरात राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण काम सुरु आहे. शिरोली ते पंचगंगा पूल आणि तावडे हॉटेल ते उचगांव रेल्वे उड्डाण पूल या अडीच हजार मीटर मार्गावर भराव टाकून महामार्गाची उंची वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वी भराव टाकून उंची वाढवून बांधलेल्या महामार्गाच्या भरावाच्या अडथळ्यामुळे महापूरात शहर व छोटी छोटी गावे पाण्यात बुडतात. आणखी भराव टाकल्यास पूराचा फटका बसून कोल्हापूर कायमपणे पाण्यात जाईल. महामार्गाचा आराखडा न करता घाईगडबडीने काम सुरु केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या कामावर जनता लक्ष ठेवणार आहे. चुकीचे कामकाज झाल्यास रस्त्यावर उतरुन जनआंदोलन करण्याचा इशाराही नागरी कृती समितीने दिला आहे.या आंदोलनात अशोक पोवार, रमेश मोरे, उजळाईवाडी येथील राजू माने, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, चंद्रकांत सूर्यवंशी, विनय कदम, प्रकाश आमटे, प्रसाद बुलबुले, राजाभाऊ मालेकर, तानाजी चव्हाण. उजळाईवाडीचे ग्रामपंचायत सदस्य विलास कुंभार, प्रकाश सुर्यवंशी, नायकू बागणे, रंजीत पवार, महादेव जाधव, अमृत शिंदे, इंजिनिअर महेश जाधव, कादरभाई मलबारी, रफिक मुल्ला आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक